HomeUncategorizedशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व...

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या दौऱ्यावर.- जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती.🛑विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन महिलांना १० वर्षे सक्त मजूरीची शिक्षा. – डॉ. अनिता एस. नेवसे मा. जिल्हा न्यायाधीश – १ व अति. सत्र न्यायाधीश, चिपळूण

🛑शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या दौऱ्यावर.- जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती.
🛑विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन महिलांना १० वर्षे सक्त मजूरीची शिक्षा. – डॉ. अनिता एस. नेवसे मा. जिल्हा न्यायाधीश – १ व अति. सत्र न्यायाधीश, चिपळूण

चिपळूण :- प्रतिनिधी.

विवाहितेची छळवणूक करणे, तिला शिवीगाळ करणे व तिला आत्महत्या करणेस प्रवृत्त करणे या गुन्हयासाठी डॉ. अनिता एस. नेवसे मा. जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, चिपळूण यांनी जिल्हा न्यायालयात आज आरोपी सासू हिरा मधुकर नाटेकर, जाऊ प्रतिभा नितीन नाटेकर व नणंद पुष्पा रत्नाकर जांभारकर या तिन्ही आरोपींना भा.द.वि. कलम ४९८-अ, ३०६, ५०४ सह ३४ हया गुन्ह्याखाली सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय धरून प्रत्येकी १० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा व प्रत्येकी ८०००/- रूपये दंड व दंड न भरल्यास कारावासाची शिक्षा ठोठावली.
⚫गुन्हयाची सविस्तर हकिकत अशी की, सदरहू गुन्हा मौजे असगोली खारवीवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे दिनांक १४/०९/२०१७ रोजी १२.०० वाजणेचे सुमारास घडला असून यातील फिर्यादी आरती मंगेश नाटेकर (मयत), आरोपी नं १ हिची सून होती. फिर्यादीचे लग्न होवून सुमारे ११ वर्षांचा कालावधी झालेला होता व तिला निल नावाचा दहा वर्षाचा मुलगा आहे. फिर्यादीचा नवरा मंगेश मधुकर नाटेकर हा मुंबई येथे मासेमारीचा व्यवसाय करीत होता. तिन्ही महिला आरोपींनी संगनमताने फिर्यादी हिने तिच्या सामाईक घरात सुखाने व आनदाने संसार करू नये व निघून जावे या उद्देशाने तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच तिला वेळोवेळी शिवीगाळ व अपमानित करून आत्महत्या करणेस भाग पाडले त्यामुळे दिनांक १४/०९/२०१७ रोजी सून आरती जमिनीवरून पाय घसरून पडल्याने आरोपीला तिचा धक्का लागलेचे कारणावरून सासू हिरा नाटेकर हिने पुन्हा सुनेची शिवीगाळ करून छळवणूक केली. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून आरती मंगेश नाटेकर हिने रॉकेल ओतून स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर घटनेत सून आरती ९५ टक्के भाजली. तिने तिचा मृत्यूपूर्व जबाब सरकारी दवाखान्यामध्ये दिला त्यामध्ये तिन्ही आरोपीविरूध्द तिने तक्रार दिली त्यावरून प्रथम ४९८(अ), व ५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला. आरती रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे मयत झाली. त्यामुळे कलम ३०६ हे वाढीव कलम लावून सदरचा खटला चिपळूण जिल्हा न्यायालयामध्ये चालला. सरकार पक्षातर्फे अॅड. श्री. प्रफुल्ल साळवी यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले व खटल्यातील मृत्यूपूर्व जबाब आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळ या बाबी शाबित करण्यासाठी विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. सर्व साक्षीपुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद तसेच मयताचा नवरा यांनी सत्याच्या बाजूने आपली आई, बहिण व भावजय यांचेविरूध्द दिलेली साक्ष ग्राहय मानून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आरोपींना दोषी ठरवून भा.द.वि कलम ३०६ च्या गुन्हयासाठी १० वर्षे सक्तमजूरी व ५०००/- रु दंड, कलम ४९८ (अ) गुन्हयासाठी ३ वर्षे सक्तमजूरी व प्रत्येको २०००/- रू दंड, ५०४ गुन्हयासाठी २ वर्षे साधा कारावास व १०००/-रू दंड अशी शिक्षा तिन्ही महिला आरोपींना आज जिल्हा न्यायालयात सुनावली.
प्रस्तुत केसमधील सरकारी वकील म्हणून अॅड. श्री. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी काम पाहिले. तसेच सदर गुन्हयाचा तपास पो.उ.नि. दिलीप जाधव यांनी केला व पो.हे.कॉ. श्री. प्रदीप भंडारी यांनी सरकार पक्षास मदत केली. महिलेनेच, महिलेविरूध्द केलेल्या गुन्हयामध्ये सुध्दा न्यायालयासमोर सबळ पुरावा आल्यास शिक्षा दिली जाते. याबाबत अभिप्राय सरकारी वकिल यांनी व्यक्त केला
.

🛑शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या दौऱ्यावर.
तर उध्दव ठाकरे हे या दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी भेटी देणार असल्याची माहीती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे.

कणकवली:- प्रतिनिधी.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देणार असून, त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार परिषद देखील होणार आहे.सिंधुदुर्ग किल्ल्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीचे दर्शन देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
🅾️4 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे सावंतवाडी येथे सकाळी 11.30 वाजता गांधी चौक या ठिकाणी भेट देणार आहेत. दुपारी 12.30 वाजता कुडाळ येथील जिजामाता चौक, दुपारी 1.30 वाजता मालवण विश्रामगृह, त्यानंतर दुपारी 2 वाजता सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट. दुपारी 3.30 वाजता मालवण आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन, सायंकाळी 5.30 वाजता कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी मुक्काम व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.
🔴5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद, सकाळी 11.30 वाजता तरळे, दुपारी 12 वाजता राजापूर जकात नाका, दुपारी 12.30 वाजता धुत पापेश्वर मंदिर ची पाहणी. दुपारी 1 वाजता बारसू येथे देवाचे गोठणे येथे भेट, त्यानंतर 1. 45 वाजता पावस मार्गे रत्नागिरी. दुपारी 2.30 वाजता रत्नागिरी, 3.30 वाजता देवरुख, सायंकाळी 5 वाजता चिपळूण व तिथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी या दौऱ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.