🛑समरजीतराजेंच्या जनता दरबारात मिळाले आणखी एका युवकाच्या पंखांना बळ.
(नगरपालिकेत तीन वर्षे खेटे मारणा-या तरुणास समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्नांमुळे व्यवसायासाठी मिळाली हक्काची जागा.)🛑आजरा महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान.
गडहिंग्लज प्रतिनिधी.
येथील अझहर बोजगर या तरुणास नगरपालिकेकडे तीन वर्षे खेटे मारूनही व्यवसायासाठी जागा मिळत नव्हती. त्याने शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या कागलमध्ये झालेल्या जनता दरबारात याबाबतची कैफियत मांडली. घाटगे यांनी तातडीने दखल घेतली. नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून याबाबतची माहिती घेऊन व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणेबाबत सांगितले. त्यानुसार अझहरला सवलतीच्या भाड्याने जागा मिळाली.
घाटगे यांच्या जनता दरबारात या तरुणाच्या पंखांना बळ मिळाले.
या जागेसाठी तीन वर्षे हेलपाटे मारणाऱ्या अझहरला राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्नामुळे केवळ तीन महिन्यात जागा मिळाल्याने स्वतःचा चिकन सेंटरचा व्यवसाय सुरू केला. घाटगे यांच्याच हस्ते या दुकानाचे थाटात उद्घाटन करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोजगर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
याबाबत अधिक माहिती अशी.
येथील अझहर व असिफ हे भाऊ मटन मार्केटमध्ये पारंपरिक मासे विक्रीचा व्यवसाय करतात.दोघांसाठी दोन स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मनोदय होता. मात्र जागेअभावी ते दुसरा व्यवसाय सुरू करू शकत नव्हते. त्यासाठी त्यांनी नगरपालिकेकडे गेल्या तीन वर्षापासून मागणी करुनही राजकीय हस्तक्षेपातून त्यांना जागा मिळत नव्हती.मार्केटमधील जादा दराप्रमाणे जागा घेऊन त्याचे भाडे त्यांना परवडणारे नव्हते. यावेळी एम.एस.बोजगर, राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, भीमराव कोमारेयांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट १ — अझहर बोजगर -आदमी ना पदसे,ना कदसे बडा….
नोकऱ्या मिळत नसल्यामुळे व्यवसायाकडे वळणा-या तरुणांच्या पाठीशी राजेंनी खंबीरपणे रहावे.मी अडचणीत असताना त्यांच्या मदतीच्या आधारामुळे मला दुकान सुरु करता आले.आदमी ना पदसे,ना कदसे बडा होता है,जो मुष्किलोमें खडा वोही सबसे बडा होता है.हे राजेंनी कृतीतून दाखवून दिले आहे.
कोट २ — प्रत्यक्ष कृतीतून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन-समरजितसिंह घाटगे
बहुजन समाजातील तरुणांनी राजकारणासाठी नेत्यांचे मागे न फिरता व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. बहुजन समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत आहोत.अल्पसंख्याक समाजातील अझहरने अडचणींवर मात करुन यशस्वीपणे व्यवसाय सुरु करुन प्रत्यक्ष कृतीतून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले आहे.
आजरा महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मासेवाडी येथे संपन्न होत आहे या शिबिरामध्ये महिलांसाठी हळदीकुंकू च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय रश्मी गाडगीळ यांनी महिला सबलीकरण व सक्षमीकरण याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या महिलांची त्यांच्या लहानपणापासूनच आरोग्याची काळजी घेतली गेली तर त्यांचे सामाजिक आर्थिक सबलीकरण व सक्षमीकरण चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. आज वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होत असून त्यांना सामोरे जाण्यासाठी आपले आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. यावेळी त्यांनी महिलांना आरोग्य विषयक येणाऱ्या अडचणी समस्या या विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मासेवाडी गावातील महिलांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण केले होते त्या अनुषंगाने त्यांनी येथील महिलांना येणाऱ्या आरोग्यविषयक अडचणींची सविस्तर चर्चा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी समृद्धी चोडणकर आभार सिद्धी होरंबळे हिने मानले
या कार्यक्रमासाठी सहायक प्रकल्प अधिकारी प्राध्यापिका लता शेटे व महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका,मौजे मासेवाडी येथील ग्रामस्थ माता भगिनी उपस्थित होत्या

