अखेर आजरा दंगलीतील संशयित आरोपीची पंधरा वर्षांनी निदोर्ष मुक्तता.
आजरा.-प्रतिनिधी.
आजरा येथे सन २००८ मध्ये उसळलेल्या हिंदू मुस्लीम दंगलीच्या वेळी धार्मिक भावना दुखावणारे पत्र प्रसिद्ध केल्याचा आरोप करून सदर दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आजरा गावातील परशुराम बामणे, दयानंद भोपळे, विजय थोरवत, संजय होडगे जयसिंग पाटील वगैरे आठ आरोपीविरुद्ध भारतीय भारतीय दंड संहिता कलम १५३A , B व कलम २९५ A, १०९, ५०५ खाली आजरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याचे तपासांती आजरा पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकाऱ्यानी संबंधित आरोपीविरुद्ध आजरा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांना दोष मुक्त करण्याकरता मे. न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर आरोपीतर्फे वकिलांचा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपींना दोषमुक्त करण्याचा आदेश केला आहे. सदर कामांमध्ये आरोपींचे वतीने ॲडव्होकेट शैलेश देशपांडे ॲडव्होकेट देवदास आजगेकर ॲडव्होकेट धनंजय देसाई व ॲडव्होकेट सचिन इंजल यांनी काम पाहिले. सदर कामी आजरा वकील संघाच्या इतर सर्व सदस्यांनी सदर कामी सहकार्य केले.
