🛑राष्ट्रीय महामार्गाच्या अन्यायी कामकाजा विरोधात.- समीर मोरजकर यांचा आत्मदहनाचा इशारा.
🛑इको झोन मधील बेकायदेशीर उत्खलन कायमचे थांबवावे.- जनहित पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शन. (आजरा तहसीलदार यांना निवेदन. )
आजरा.- प्रतिनिधी.

राष्ट्रीय महामार्गाच्या अन्यायी कामकाजा विरोधात आजरा समीर मोरसकर यांनी आजरा तहसीलदार यांना निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आमच्या मोरजकर घराण्याच्या श्री विठोबा देव नबापूर या ट्रस्टच्या जमिनी आजरा येथे रामतीर्थ रस्त्या लगत वळनावर आहेत. सदर जमिनी (गट नं ३४/२ व गट नं ४९) राष्ट्रीय महामार्ग लगत आहेत, पण राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्या महामार्गामध्ये बाधित आहेत याबद्दल कोणतीही सूचना आज पर्यंत आम्हाला दिलेली नाही किवा आज पर्यंत त्या महामार्गामध्ये घेणार म्हणून त्याची कोणतीही मोजणी झालेली नाही. असे असता महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टरने आमच्या जमिनीमध्ये आत दहा फूट हद्दी चा खांब रोवलेला आहे. तसेच आमच्या हद्दीतील झाडे तोडण्यासाठी ठेकेदाराला सूचना दिल्या गेल्या. माझ्याही गोष्ट कानी आल्यावर मी लगेच त्याला हरकत घेतली. व हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी तुमच्या जमिनी हायवे मध्ये बाधित होत नसल्याबद्दल सांगितले. महामार्गाच्या मूळ प्रस्तावामध्ये सुद्धा आमच्या वर नमूद गट नंबरचा उल्लेख नाही आहे. असे असताना सुद्धा हायवे ठेकेदार मुजोरपणाने काम करीत असल्याचे दिसते. वरील कायदेशीर बाबी डावलून जबरदस्तीने आमच्या जमिनीतून हायवे घातल्यास मला आत्मदहन करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. यापूर्वी आमची जमीन तीन एकर चित्री प्रकल्पासाठी, २१ गुंठे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहासाठी, रामतीर्थ रस्त्यासाठी साधारणतः २७ ते ३० गुंठे अशी आम्ही दिलेली आहे. आता आमच्याकडे या जमिनीवाचून दुसरा कोणताही उत्पन्नाचा मार्ग नाही. महोदय आपण तालुक्याचे पालक आहात आपल्या डोळ्या देखत राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार आमच्यावर अन्याय करून बेकायदेशीर पणे आमची जमीन काढून घेत आहेत, आपण जर आम्हाला न्याय दिला नाही तर मी शुक्रवार १२ रोजी आमच्या शेतामध्ये आत्मदहन करणार असा इशारा या पत्राद्वारे आपल्यास देत आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर मोरजकर यांची सही आहे. निवेदन नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्याकडे देण्यात आले. यावेळी समीर मोरजकर, भारतीय जनहित पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी, नगरसेवक आनंदराव कुंभार,महादेव कुंभार, रोहित कोरवी व नागरिक उपस्थित होते.
इको झोन मधील बेकायदेशीर उत्खलन कायमचे थांबवावे.- जनहित पार्टी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शन. (आजरा तहसीलदार यांना निवेदन. )
आजरा.- प्रतिनिधी.

इको झोन मधील बेकायदेशीर उत्खलन कायमचे थांबवावे अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय जनहित पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी यांनी आज रात तहसीलदार यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा तालुक्यात मागील अनेक वर्षापासून किटवडे, अंबाडे, शेळपट, देवर्डे येथे महसुल विभागाच्या परिसरात व खाजगी जागेत होत असलेले इकोझोन मधील बेकायदेशीर उत्खनन याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असताना याला जबाबदार प्रत्यक्षात महसूल विभाग आहे. इकोझोन असल्यामुळे रॉयल्टी परवानगी असे विषय है बाजूलाच असतात परंतु प्रत्यक्षात इतक मोठ उत्कलन होत असताना महसूल विभाग झोपला आहे का ? झोपेचं सोंग घेतलेल्या या विभागाला जाग करण्याची वेळ आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्कलन होत असताना महसूल विभागातील एकही अधिकान्यांना याची कल्पना नसणे असे होत नाही. यालाच कानाडोळा असे म्हणतात मग या ठिकाणी शंखेची पाल चुकचुकते व आर्थिक व्यवहार झाला असल्याचा वास येतो व हाच वास तालुक्यात सर्वत्र दूरवर दरळवत आहे. या बेकायदेशीर उत्खलन करणाऱ्या ठेकेदारांना महसूल प्रशासनाचा आशीर्वाद मिळत असल्याचे ऐकायला मिळते संबंधित ठेकेदार हे दिवसभरात काबाडकष्ट करून उत्खनन करून मिळणाऱ्या उत्पनातून पोटाची खलगी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात हे जरी खरं असलं तरीही शासनाने इकोझोन जाहीर केला असताना
किटवडे तालुका आजरा येथील इकोझोन मधील बेकायदेशीर उत्खलन यामध्ये बेकायदेशीर उत्खलन होतं त्याला जबाबदार तरी कोणाला धरायचं यामध्ये काही तलाठी यांनी काही ठेकेदार यांच्यावर दंडात्मक नोटीस देऊन कारवाई करणे म्हणजेच कायद्यातील पळवाट असे नागरिकांचे मत आहे. यामध्ये काही ठेकेदारांना दंड केलेला देखील समजतो याबाबत जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करून इकोझोन मध्ये होत असलेले उत्खनन ताबडतोब कायमचे थांबवले पाहिजे अशी मागणी आजरा तालुक्यातील नागरिकाकडून होत असल्याने अखिल भारतीय जनहित पार्टी आजरा तालुका यांच्या वतीने सदर उत्कलन नाही थांबल्यास पार्टीच्या पक्ष अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या वतीने निदर्शने करणार असल्याचे आपल्याला सुचित करत आहोत. या निवेदनावर
जिल्हा अध्यक्ष ग्रामीण
प्रभाकर कोरवी, तसेच शिवराय लोखंडे, शाहिद मुल्ला,राहिल खेडेकर, रोहित कोरवी, आकाश लोखंडे सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
