HomeUncategorizedआजरा शहरवासीयांच्या व्यथा - राष्ट्रीय महामार्ग अधिकारी सोडविणार का.?( शहरवासीयांच्या समावेश तालुक्यातील...

आजरा शहरवासीयांच्या व्यथा – राष्ट्रीय महामार्ग अधिकारी सोडविणार का.?( शहरवासीयांच्या समावेश तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक संपन्न. )

आजरा शहरवासीयांच्या व्यथा – राष्ट्रीय महामार्ग अधिकारी सोडविणार का.?
( शहरवासीयांच्या समावेश तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक संपन्न. )

आजरा.- प्रतिनिधी.

राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर बांदा या रस्त्याच्या कामाला सुरुवातच उशिरा झाल्याने मागील पावसाळा चिखलात गेला तर आताचा उन्हाळा धुळीच्या साम्राज्यात जाणार आहे. हा होत असलेला नागरिकांना त्रास व या राष्ट्रीय महामार्गामुळे अन्य वाहनांची व प्रवासांची व्यथा मांडण्यासाठी आजरा शहरवासीयांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता अनिल पाटील तहसीलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने आजरा शहरात राष्ट्रीय महामार्गचे काम चालू असल्यामुळे अनेक निर्माण होणारे अडथळे तसेच धुळीच्या साम्राज्यापासून लोकांना होत असलेला आरोग्याच्या दृष्टीने त्रास. असे अनेक वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले. यामध्ये साखर कारखाना ऊस वाहतूक ट्रॅक्टर व ट्रक क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून एकमेकाला ओव्हरटेक करणे ट्रॅक्टर वर मोठा स्पीकर लावून गाणी वाजवणे ट्रॅक्टरला ट्रकला रिप्लेटर नसणे नव्याने होणाऱ्या रस्त्यामुळे दोन्ही बाजूला रस्ता रुंदीकरण झाला आहे त्या ठिकाणी वाहने उभी करून रहदारीला त्रास करणे याबाबतच्या जबाबदाऱ्या आजरा पोलीस स्टेशन घ्याव्या संबंधित वाहनधारकांना सूचना द्याव्यात. या वाहनांच्या वाढत्या वर्धेमुळे धुळीचा त्रास होत आहे. यासाठी रस्त्यावरती दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी मारण्यात यावे. पूर्वी सूचना केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्ही पाणी मारतो असे सांगून दोन-तीन दिवस एक दोन वेळा पाणी मारले यानंतर तसाच धुळीचा प्रश्न राहिला आहे.
तसेच महामार्गाच्या रस्त्याच्या गटर्स कामामुळे पाईपलाईन फुटत आहेत. व पाणी वाया जात आहे. व दुसरीकडे नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत विनाकारण पाणी वाया घालवत आहे. तर गटर्स त्यासाठी मारलेले खड्डे हे एक दोन महिन्यापासून तसेच आहेत. जर आपल्याला लवकर गटर्स करायचा नव्हत्या तर एक दोन महिने अगोदर तुम्ही खड्डे कशाला मारून ठेवला, अगोदरच
नगरपंचायत मधील अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी शहरात रस्ता नादुरुस्ती, पाणी पाईपलाईन लिकेज खड्डे मारून तसेच पाणी वाया जात आहे काही पिकांची लिकेज काढले जात नाही. आजरा शहराच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिन्यातून एक वेळा जनता दरबार भरण्यात यावा व नागरिकांच्या समस्या समजून घेऊन कामकाज करावे यापूर्वी ग्रामपंचायत असताना ग्रामसभा असच होती. परंतु नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरपंचायत मध्ये काय काय कारभार चालला आहे. याची काही कल्पना नागरिकांना नसते व आमच्या समस्या तिथेच राहून जात आहेत यासाठी नगरपंचायतने जनता दरबार भरवावा अशीही मागणी करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री.कुमार ढेरे, नगरपंचायत अधिकारी श्री चव्हाण यांसोबत आजरा अन्याय निवारण संघाचे अध्यक्ष परशुराम बामणे, अॅ..शैलेश देशपांडे, सी. डी. सरदेसाई, प्रभाकर कोरवी, नाथ देसाई, सुधीर कुंभार, गौरव देशपांडे, संदीप पारळे, विजय थोरवत, गणपतराव डोंगरे, राजेश विभूते,अभिषेक रोडगी, प्रशांत गजरे, रौनक कारेकर, महेश दळवी, समीर चांद, नौशाद बुद्देखान, आकाश शिंदे, सलीम लतीफ व आजरेकर रहिवासी उपस्थित वरील चर्चेत सहभाग नोंदवला.

चौकट.-

राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर – बांदा वरील खड्डे भरणे व इतर मागण्या केल्या मान्य.

बुधवार दि. २० डिसेंबर रोजी आजरा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदार यांनी आजरा एम.आय डि.सी. ते मडीलगे मार्गावरील खड्डे येत्या आठवड्यात भरून रोज तीन ते चार वेळा रस्त्यावरील भुळ उडून वाहतुकीस अडचण होऊ नये यासाठी टँकरने पाणी मारण्याचे देखील मान्य केले.
त्याचसोबत सध्या महामार्गावरील गटारीच्या कामामुळे जे नळ पाईपलाईन तोडली गेली ती पुन्हा नव्याने जोडून पिण्याचे पाणी पुरवठा सुरळित करण्याचे आजरा नगरपंचायत व महामार्ग प्रशासन यांनी मान्य केले.
गेल्या २०० वर्षापासूनची जी जुनी झाडे तोडली गेली आहे त्याबदल्यात पुन्हा नव्याने स्थानिक प्रजातीची झाडे (आंबा,वड,पिंपळ इ) लावण्याची मागणी आजरेकर रहिवाशांनी केली.
तसेच आजरा कचरा डेपोमध्ये लावण्यात येत असलेल्या आगीमुळे गांधीनगर मधील रहिवासी व ग्रामीण रुग्णालय यांना होणारा त्रास कसा कमी करता येईल ही मागणी नगरपंचायत प्रशासन यांनी मान्य केली. मान्य केलेल्या मागण्या कितपत पूर्णत्वास जातात हे येणारे समजेल परंतु मागण्या मान्य केल्याप्रमाणे पूर्ण नाही केल्यास आंदोलनाच्या पवित्र्यात असणार आहेत हे मात्र निश्चित.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.