HomeUncategorizedराज्यातील देशातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या एकाच ठिकाणी पहा….👇 🛑राज्यातील १९३ बसस्थानकांचा होणार...

राज्यातील देशातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या एकाच ठिकाणी पहा….👇 🛑राज्यातील १९३ बसस्थानकांचा होणार कायापालट.- एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात ६०० कोटींचा सामंजस्य करार 🛑फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा 🛑अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का.- राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक लढवण्यास कोर्टाने घातली बंदी. 🛑धक्कादायक!.- महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद – सर्वाधिक रूग्ण मुंबईत.👇

राज्यातील देशातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या एकाच ठिकाणी पहा….👇
🛑राज्यातील १९३ बसस्थानकांचा होणार कायापालट.- एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात ६०० कोटींचा सामंजस्य करार
🛑फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
🛑अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का.-
राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक लढवण्यास कोर्टाने घातली बंदी.
🛑धक्कादायक!.- महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद – सर्वाधिक रूग्ण मुंबईत.👇

मुंबई.- प्रतिनिधी.

राज्यासह महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. मंगळवारी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी कोरोनाची 11 प्रकरणं समोर आल्याने चिंता वाढली आहे. मुख्य म्हणजे यामधील सर्वाधिक रूग्ण हे राजधानी मुंबईत आहेत.या नव्या रूग्णांमुळे आतापर्यंत कोरोनाचे एकूण 35 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.
🛑राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1 चा रुग्ण आढळल्यानंतर देशात चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

🔴मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडलेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीननुसार, मुंबईमध्ये 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण एक्टिव्ह आहे. होम आयसोलेशनमध्ये 23 रुग्ण असून एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये आहे. या रूग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय.

हेल्थ बुलेटीननुसार, मंगळवारी एकाही रूग्णाला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाने 80,23,407 रूग्ण बरे झाले आहेत. तर दुसरीकडे मंगळवारी एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

🟥भारतात कोविड-19 चे सब-व्हेरियंट JN.1 चे पहिलं प्रकरण 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवण्यात आलं होतं. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट सापडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये होतं. देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN.1 प्रकारातील पहिलं प्रकरण समोर आल्याने केंद्राने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत पाळत ठेवण्यास सांगितलं.

केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, “केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सातत्यपूर्ण आणि कामामुळे आम्ही कोरोना-19 प्रकरणांची आकडेवारी कमी करू शकलो. कोविड-19 विषाणूचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी गती राखणं महत्त्वाचं आहे.

🟥तसेच पंत यांनी असंही म्हटलंय की, केरळसारख्या काही राज्यांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. कोविड सब-व्हेरियंट JN.1 चे पहिलं प्रकरण 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवलं गेलंय. यापूर्वी, तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका प्रवाशाला सिंगापूरमध्ये JN.1 प्रकाराची लागण झाल्याचं आढळून आलं होतं.

🟥दरम्यान भारतात कोविड-19 चा नवा व्हेरिएंट JN.1 चा पहिला बाधित 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवण्यात आला. तेव्हापासून केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आहे. देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN.1 प्रकारातील पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत कोविडच्या प्रकरणावर देखरेख ठेवण्यास सांगितले आहे.

देशात 127 नव्या रुग्णांची नोंद.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सोमवारी भारतात कोरोनाव्हायरस संसर्गाची एकूण 127 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात एकट्या केरळमधील 111 प्रकरणांचा समावेश आहे. यासह देशात कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 1828 वर पोहोचली आहे. यापैकी 1634 रुग्ण हे एकट्या केरळमध्ये नोंदवले गेले आहेत. केरळमध्ये एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये आढळला नवा JN.1 व्हेरिएंट

ICMR महासंचालक डॉ राजीव बहल यांनी सांगितले की,8 डिसेंबर रोजी केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलम येथील आरटी-पीसीआर नमुन्यात कोरोनाचा नाव व्हेरिएन्ट आढळला. येथील एका महिलेत इन्फ्लूएंझासारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती आणि ती आता कोविड-19 मधून बरी झाली आहे. नवीन कोविड प्रकाराबाबत केंद्राने राज्य सरकारांना एक अॅडव्हायजरी देखील जारी केली आहे.

🔴केरळमुळे उत्तराखंड देखील सतर्क

केरळमध्ये कोरोना JN.1 चे नवीन प्रकार आढळल्यानंतर उत्तराखंड देखील सतर्क झाले आहे. राज्य सरकारने मंगळवारी SOP जारी केला आणि संशयास्पद लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी आणि निरीक्षण करण्याबाबत खबरदारी म्हणून सर्व रुग्णालयांना सतर्क केले आहे. केरळमध्ये कोरोनाचे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर सोमवारी केंद्र सरकारने सर्व राज्यांना शोध आणि लक्ष ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

🛑अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का.-
राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक लढवण्यास कोर्टाने घातली बंदी.

न्यूयाँर्क:- वृत्तसंस्था.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणात दोषी मानत कोर्टाने त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित केलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवता येणार नाही. याशिवाय निवडणुकीत मतदान देखील करता येणार नाही. अमेरिकेच्या कोलोरॅडो हायकोर्टाने मंगळवारी हा निर्णय दिला आहे.
अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही, तर कोर्टाने व्हाईट हाऊसच्या निवडणूक शर्यतीतील प्राथमिक अध्यक्षीय मतपत्रिकेतून ट्रम्प यांचं नाव काढून टाकले आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १४ व्या घटनादुरुस्तीच्या कलम ३ चा वापर राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यासाठी केला गेला आहे.

६ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारून पराभव झाला होता. डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांनी ट्रम्प यांना तब्बल ७० लाखांहून अधिक इलेट्रोल मतांनी हरवलं होतं. मात्र, निवडणुकीत घोटाळा झाला, असं म्हणत ट्रम्प यांनी आपला पराभव नाकारला. याविरोधात त्यांनी अमेरिकेतल्या कोर्टातही धाव घेतली. पण, कोर्टानंही त्यांना फटकारलं आणि ही निवडणूक योग्य असून जो बायडन विजेते असल्याचं सांगितलं. एवढं होऊनही ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नाही. आणि ट्विटरवरुन सतत आपली मतं मांडत राहिले.

परिणामी ट्रम्प समर्थक आक्रमक झाले. त्यांनी अमेरिकेच्या कॅपिटल भवनाबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला. तर याशिवाय अनेकजण जखमी झाले. दरम्यान,आंदोलकांना चिथावणी देण्याचा ठपका ठेवत ट्रंप यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, ट्रम्प यांच्या विरोधात दोन तृतीयांश मते न पडल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आता कोलोरॅडो हायकोर्टाने याप्रकरणात त्यांना दोषी मानत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.

🛑फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

नागपूर:- प्रतिनिधी.

मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. आरक्षणासाठी क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारे आरक्षण देणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एक महिन्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत निवेदन सादर केलं. मराठा आरक्षणावर सरकारने निर्णय घ्यावा, २४ डिसेंबरनंतर सरकारला आपण वेळ देणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. मुख्यमंत्री विधनासभेत आरक्षणावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करणं चांगलं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत म्हटलं.

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात चालू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाविषयी निवेदन सादर केलं. आरक्षणासाठी दोन समाजात तेढ निर्माण होणं चांगलं नाही. सीएम म्हणून माझ्यासाठी सर्व जाती समान आहेत. आरक्षण हा समाजाचा अधिकार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं स्पष्ट केलं. मराठा आरक्षणावर विधानसभेत मराठा आरक्षणात ७४ आमदारांनी १७ तास १७ मिनिटे चर्चा झाली. आरक्षणाविषयी सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे. पहिल्या दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

🛑राज्यातील १९३ बसस्थानकांचा होणार कायापालट.- एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात ६०० कोटींचा सामंजस्य करार

मुंबई :- प्रतिनिधी

राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

विधानभवन येथे झालेल्या या करारप्रसंगी उद्योग मंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष उदय सामंत, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटीया, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व एसटीचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील १९३ बसस्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण होणार असून आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यभरात एसटीची ६०९ बसस्थानके आहेत. त्यापैकी सध्या ५६३ बसस्थानके कार्यरत आहेत. बसस्थानक परिसरातील खड्डे , पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. एसटी बसेसचे देखील नुकसान होते. यावर कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटीच्या अमृतमहोत्सवी समारंभात केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात MIDC १९३ एसटी बसस्थानकांच्या कॉक्रिटीकरणासाठी ५०० कोटी रुपये व रंगरंगोटी ,किरकोळ दुरुस्ती करण्याची १०० कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबविणार आहे. यातून लवकरच या सर्व बसस्थानकांचा कायापालट होणार आहे. एमआयडीसीच्या या प्रतिसाद आणि पुढाकाराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे. राज्यातील लोकाभिमुख सुविधा आणि अग्रेसर अशा उद्योग विभागाचे नवे सहकार्य पर्व सुरू होणार आहे. यातून एक वेगळे उदाहरण पुढे आल्याचेही, त्यांनी नमूद केले.

चीनमध्ये शक्तीशाली भुकंप.- अनेक इमारती कोसळल्या.-
१११ जणांचा मृत्यू;- अनेकजण जखमी

बीजिंग :- वृत्तसंस्था.

चीनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास शक्तीशाली भुकंप झाला आहे. भुकंपाने जमीन हादरल्याने शेकडो इमारतींची पझझड झाली. या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत १११ चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चीनच्या वायव्येकडील गांसू प्रांतात हा भूकंप झाला आहे. घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. युरोपीयन भूमध्य भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. तर त्याची खोली अंदाजे १० किलोमीटर इतकी होती. भूकंपामुळे चीनच्या गांसू-किंघाई सीमावर्ती भागातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. याठिकाणी मृतांची संख्या देखील जास्त आहे. चीनमध्ये आलेला हा भूकंप इतका मोठा होता ज्यामुळं गांसू शहर मोठ्या प्रमाणात उध्वस्त झालं. इतकंच नव्हे, तर शहरातील अनेक इमारती उध्वस्त झाल्या. भूकंपाची माहिती मिळताच बचाव यंत्रणासुद्धा तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम हाती घेतलं. असं असलं तरीही या महाभयंकर भूकंपामुळं अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची भीती यंत्रणा व्यक्त करत असून, बचाव कार्य वेगात सुरू आहे.
भूकंपामुळे झालेल्या नुकसानीमुळे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. चीनमधील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याने चीनच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने स्तर-IV आपत्ती निवारण आणीबाणी घोषित केली आहे. आपत्तीच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि स्थानिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी चीनकडून एक टास्क फोर्स बाधित भागात पाठवण्यात आली आहे. या स्टास्कफोर्सने पहाटेपासूनच बचावकार्याला वेग दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.