संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचे बारा वाजणार!🟥गंभीर आरोप.-7 दिवसांची पोलीस कोठडी
🟥विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा.- हिवाळी अधिवेशनात धक्कादायक माहिती समोर👇
नागपूर:- प्रतिनिधी – डी. एस. सतिश
पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक नित्यनेमाने जात असतात. विठुरायाच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून जो लाडू मिळतो, त्याचेही भाविक मनोभावे ग्रहण करतात. काहीजण तर तो प्रसाद घरीही घेऊन जातात.मात्र आता याच प्रासदाच्या लाडवावबाबत एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा लाडू आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यादरम्यान हा अहवाल सादर करण्यात आला.
🔴प्रसाद म्हणून मिळणारा हा लाडू निकृष्ट दर्जाजा असून तो ज्या कारखान्यात तयार केला जातो, तेथे स्वच्छतेचा अभाव आहे. या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो, असा इशारा लेखापरीक्षण अहवालात नोंदवला आहे. या अहवालाने विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.
🟥नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सादर झाला.
काय म्हटलं आहे अहवालात ?
या अहवालामध्ये प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूसंदर्भात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. लाडू बनवण्याचे काम बचत गट जेथे करतात ती जागा अस्वच्छ आहे. लाडू सुकण्यासाठी कळकट ताडपत्री वापरली जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.तसेच 2020➖21 मध्ये ज्या संस्थेला प्रसादाचा लाडू बनवण्याचं कंत्राट दिलं होतं. त्या संस्थेला लाडू बनवण्यासंदर्भात निकष लावण्यात आले होते.पण प्रत्यक्ष तपासणी अहवालामध्ये तफावत आढळून आली. लाडूच्या पाकिटावर जेघटक नोंदवलेले जातात, प्रत्यक्षात ते वापरलेच जात नाहीत.लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट असल्याचे कंत्राटामध्ये नमूद आहे, प्रत्यक्षात सरकीचे तेल वापरले जाते. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून जे लाडू विकले जातात, त्यांच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.
🛑संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचे बारा वाजणार!🟥गंभीर आरोप.-7 दिवसांची पोलीस कोठडी
🟥संसदेत घुसून धुडगूस घालणाऱ्यांची आता काही खैर नाही. या चारही आरोपींवर दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले. तसेच या चारही जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
🛑संसदेची सुरक्षा भेदून हे चार जण काल संसदेत शिरले होते. संसदेत शिरून त्यांनी त्यांनी स्मोक कँडल फोडली होती. त्यामुळे संसदेत पिवळा, लाल आणि पांढरा धूर झाला होता. या प्रकारामुळे खासदार चांगलेच हादरून गेले होते. काही खासदार तर जीव मुठीत घेऊन सभागृहाच्या बाहेरही पडले होते. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती.
👉🔴संसद भवनात घुसखोरी करणारे नीलम, अमोल, सागर शर्मा आणि मनोरंजन यांना अटक करण्यात आली होती. या चारपैकी दोघांवर संसदेच्या आत गोंधळ घालण्याचा आणि घोषणाबाजी करण्याता आरोप ठेवण्यात आला होता. या चौघांनाही पटियाला हाऊस कोर्टचे अॅडिशनल सेशन जज-2 डॉ. हरदीप कौर यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं. दिल्ली पोलिसांकडून प्रोसिक्यूटर इरफान अहमद यांनी युक्तिवाद केला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या चौघांची 15 दिवसांची रिमांड मागितली. पण कोर्टाने 7 दिवसांची रिमांड दिली आहे. गरज पडल्यास या चारही जणांची रिमांड वाढवण्यात येणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
🟥आरोप काय?
दिल्ली पोलिसांनी या चारही आरोपींविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे या चारही जणांवर दहशतवादाचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत. मात्र, फक्त पोलिसांना चारच जणांना पकडता आलं आहे. एक आरोपी विशाल कोठडीत आहे. पण सहावा आरोपी ललित झा हा फरार आहे.
🛑8 कर्मचारी सस्पेंड

संसदेत झालेल्या या घुसखोरी प्रकरणी आठ कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. या आठही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. अरविंद, गणेश, प्रदीप, रामपाल, विमित, नरेंद्र, अनिल आणि वीर दास असं या चौघांची नावे आहेत. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करणअयात आली आहे. या घटनेनंतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. चप्पल, बूट काढून तपासणी केली जात आहे. टोपीही काढायला सांगितलं जात आहे.
