सहकार अडचणीत असताना देखील सहकार तत्वावर कारखाना चालवला.- प्रा. सुनिल शिंत्रे.
( मडिलगेत आजरा साखर कारखाना सभासद प्रचार सभा संपन्न.)
आजरा.- प्रतिनिधी.

राज्यातील देशातील सहकार अडचणीत असताना आजरा सहकारी साखर साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाला व तरीही कारखाना सहकार तत्वावर चालवला. मडिलगे ता. आजरा येथे आजरा कारखाना सप्तवार्षिक निवडणुकीच्या सभासद प्रचार सभेत आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुनील शिंत्रे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. स्वागत व प्रस्ताविक माजी सरपंच शिवाजी गुरव यांनी केले. पुढे बोलताना श्री शिंत्रे म्हणाले
प्रामाणिकपणाने काम करण्यासाठी हाती घेतल्यास ते पूर्ण होते. पण काही आपल्यातील विघ्नसंतोषी लोकांनी पाटीत खंजीर खुपसण्याचे काम केले. कारखाना अडचणीतून कसा येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला. पण मागील गळीत हंगामातील सभासदांना साखर देणे इतकेच राहिले परंतु ऊस उत्पादकांची देणी, तोडणी ओढणी ऊस वाहतूक, कामगार पगार भागवलेली आहेत. यापुढेही सभासद कामगार यांच्या हिताचे निर्णय घेणारे पॅनल असल्यामुळे भविष्यात कारखाना व्यवस्थित चालू होऊ घातलेल्या निवडणुकीत आपण चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी चेअरमन प्रा. शिंत्रे यांनी केले.

गोकुळच्या संचालिका व उमेदवार श्रीमती अंजनाताई रेडेकर बोलताना म्हणाल्या कारखान्यात संचालक म्हणून गेल्यानंतर कारखाना कसा कर्जमुक्त होईल याकडे अधिक लक्ष देण्याचे काम आम्हाला संचालक मंडळाचे असेल मागील काळात कारखाना बंद झाल्यानंतर पुढे येऊन कारखाना चालवण्यासाठी मार्ग काढत अनेक संस्थेच्या माध्यमातून सत्तर कोटी रुपये जिल्हा बँकेत जमा केले व जिल्हा बँकेने केलेली मदत त्यावर कारखान्याचा गळीत हंगाम पार पडला. जिल्ह्यातील काही कारखान्यावर १३५ कोटीचा कर्जाचा बोजा आहे. तरीही त्या कारखान्याची निवडणूक लागली पण आपली १२५ कोटीच्या कर्जाचा कारखान्याची निवडणूक लागणार नव्हती. पण ती लादली गेली. पण या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. फक्त कारखाना साखरेवर चालणार नसून अन्य प्रोजेक्ट कारखान्यामध्ये चालू करण्यासाठी आमचे प्रयत्न आज पासून चालू आहेत. पण कामगाराच्या योगदाना सोबत आता आपली भूमिका व परिवर्तन घडवून आपण या आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी कराल अशी अपेक्षा असल्याचे श्रीमंती रेडेकर म्हणाल्या.
मडिलगे गावातील उमेदवार भिकाजी गुरव म्हणाले आजरा साखर कारखान्याची सुरुवात अमृत काकांनी केली व याला अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी कै. वसंतराव देसाई आले त्या वेळच्या मंजुरीच्या प्रवाहात केदारी रेडेकर यांची देखील मदत घेतली होती त्यावेळी सभासद नोंदणीसाठी सभासदाण्याकडे पैसे नव्हते पण कर्ज घेऊन सभासद केले व सभासदांचे भांडवल जमा केले. या प्रवाहात मी स्वतः व साखर कारखाना उभारण्याच्या योगदानात माजी संचालक कै. सदाशिव जाधव हे देखील होते. पण आम्ही एकमुखी निर्णय घेऊन कै. सदाशिव जाधव यांना संचालक म्हणून नाव दिले व कै. जाधव यांनी नी. पक्षपाती निस्वार्थीपणाने प्रामाणिकपणे काम केले व यानंतरच्या काळात पुन्हा त्या गावासाठी संचालक म्हणून उमेदवारीची जबाबदारी माझ्यावर सोपवली व ती उमेदवारी घेण्यापूर्वी मी सभासदांना बोलून उमेदवारी करण्याची परवानगी घेतली. सध्या चाळोबा देव शेतकरी विकास आघाडी या आघाडीतील नेते आपापल्या वरिष्ठ नेत्याकडून नेत्यांकडून कारखाना सहकारात चालवत कारखाना कसा कर्जमुक्त होईल याकडे लक्ष देणारी व त्यांच्यामध्ये धमक असणारी मंडळी आपण संचालक म्हणून निवडून द्यावी कारण ती सर्व मंडळी या पॅनल मध्ये आहेत आपण सर्वांनी या पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी श्री गुरव यांनी केले.
यावेळी बोलताना उमेदवार जि.प.चे माजी उमेश आपटे म्हणाले आजरा सहकारी साखर कारखाना २८ वर्षांपूर्वी कर्जाचा विळाव्यात सापडला कारखान्याच्या योगदानामध्ये मुकुंदराव आपटे व बाबासो धुरे हे जिवाभावाचे मित्र. यांचे देखील योगदान या कारखाना उभारणीत आहे. ही सामाजिक बांधिलकी जपणारी तालुक्यातील नेते त्यांच्या पक्षात चाललेले राजकारण हे या कारखान्यात संचालक मंडळात माजी माणसे किती माझं सर्व पॅनल पॅनल मध्ये माझी सर्व डोकी पाहिजेत म्हणणारी नेते आहेत. पण कारखाना चालवण्यासाठी किती जणांना डोके आहे. हे सभासदांनी शोधायचे आहे. व डोके असणाऱ्या लोकांना सभासदांनी निवडून द्यावे. संस्था चालण्याचा अनुभव असणारी या पॅनमध्ये सर्व मंडळी आहेत. पण आपण सभासद म्हणून ज्येष्ठ आहात आपण विचारपूर्वक या पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे. असे श्री आपटे म्हणाले
यावेळी उमेदवार प्रकाश चव्हाण, संजय पाटील तसेच के व्ही येसने, जनार्दन निऊगरे, युवराज पोवार यांनी आपली भूमिका मांडत सभासदांना संपूर्ण पॅनलला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी आजरा कारखान्याचे बिनविरोध झालेले संचालक संभाजी पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच सुशांत गुरव सदस्य पांडुरंग जाधव, डॉ. आनंद कांबळे सदस्या कविता घंटे सौ काणेकर, निवृत्ती पाटील संदीप पाटील आतिश कुमार देसाई गणपतराव पाटील, गणपती कातकर, हनुमान समूहाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भावेश्वरी समूहाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते लोकमान्य समूहाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला समूहाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी पारळे यांनी सूत्रसंचालन केले तर उपसरपंच सुशांत गुरव यांनी आभार मानले.
