Homeकोंकण - ठाणेआजरा साखर कारखान्यास उस बिलासाठी मालतारण कर्ज मंजुर- ऊस उत्पादकाने निश्चित रहावे.-...

आजरा साखर कारखान्यास उस बिलासाठी मालतारण कर्ज मंजुर- ऊस उत्पादकाने निश्चित रहावे.- कारखाना व्यवस्थापनाचे आवाहन.

आजरा साखर कारखान्यास उस बिलासाठी मालतारण कर्ज मंजुर- ऊस उत्पादकाने निश्चित रहावे.- कारखाना व्यवस्थापनाचे आवाहन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्या मार्फत कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेकडे ऊस पुरवठादारांची ऊस बिले व अनुषंगीक खर्चासाठी दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कोल्हापुर जिल्हा मध्य. सह. बँकेने मान्यता देवून रु ६०००.०० लाख इतके मालतारण कर्ज मंजुर केले असुन त्याअनुषंगाने गळीतास येणा-या ऊसाची बिले तसेच तोडणी वाहतुक बिले देणेचे नियोजन कारखाना व्यवस्थापनामार्फत केले जाणार आहे.
गळीतास येणा-या ऊसाची बिले शेजारील कारखान्यांच्या बरोबरीने ऊस बिले देणार असलेचे धोरण कारखाना व्यवस्थापनाचे आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील पिकविलेला संपुर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास आणणेचे नियोजन देखील केले जात आहे. तरी कार्यक्षेत्रातील व कारखान्याकडे नोद केलेल्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतक-यांनी आपण संपुर्ण ऊस कारखान्यावर विश्वास ठेवुन गळीतास पाठवावा. गाळपास येणा-या ऊसाची बिले मुदतीत ऊस पुरवठादारांच्या खाते वर जमा केली जाणार आहेत असे अवाहन कारखाना व्यवस्थापनामार्फत केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.