आजरा साखर कारखाना निवडणूक रणधुमाळीला तात्पुरता ब्रेक –
अखेर आजरा साखर कारखाना बिनविरोध व जागावाटप फार्मूला ठरला.- अपक्षांची मनधरणी करण्यास यश आल्यास कारखाना निवडणूक बिनविरोध होणार.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणातून कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे कारखाना सभासद व कामगार यांच्या हितासाठी निवडणुकीचा बोजा कारखान्यावर होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतील सद्यस्थितीला माघार घेण्याचे स्पष्ट केले आहे. कदाचित ही भूमिका माघारपर्यंत कायम राहिल्यास व अपक्षांची मनधरणी करण्यास नेत्यांना यश आल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातो पण आजरा साखर कारखान्याची निवडणूक लागणारच असे भाकीत काही सभासद करत आहेत परंतु बुधवार रोजी झालेल्या वारणा येथील बैठकीत भाजप, काँग्रेस व दोन्ही शिवसेना गटासह स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रीत आले आहेत. वारणा येथे नेत्यांच्या बैठकीत निर्णय निश्चित झाल्याचे समजते. यामध्ये भाजप म्हणून अशोक चराटी यांच्या गटाला १०, तर राष्ट्रीय काँग्रेसला ८ तर शिवसेना ( उध्दव ठाकरे) गटाला ३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
१ डिसेंबरला माघारीचा अंतीम दिवस असून आज गुरुवारी (ता. ३०) पॅनेल रचनेला अंतीम स्वरुप मिळणार आहे. आमदार विनय कोरे व आमदार सतेज पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे.
बुधवारी कोल्हापूर व वारणा या दोन ठिकाणी राजकीय घडामोडी झाल्या, कोल्हापूर येथील अजिंक्यतारा येथे दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या सोबत बैठक झाली. वारणानगर येथे सायंकाळी सात वाजता आमदार आम. कोरे यांच्या सोबत बैठकीत. अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, श्रीमती अंजनाताई रेडेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, संभाजी पाटील,
मलिककुमार बुरुड, विलास नाईक, युवराज पोवार
अमृते, दिनेश कांबळे, अभिषेक शिंपी, जनार्दन टोपले, आदी प्रमुख उपस्थित होते. सर्व नेते व पदाधिकारी यांनी कारखान्याच्या हितासाठी एकत्रित यायचे आहे. निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. तालुक्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. प्रमुख नेतेमंडळी निवडणूकीतून बाजूला गेले तर सभासद, शेतकरी व कर्मचा-यांची जबाबदारी देखील महत्त्वाची आहे असा विचार पुढे आला. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूवीच निवडणूक रिंगणातून बाजूला राहणार असल्याचे सांगीतल्याने उर्वरीत सर्वांनी एकत्रित येवून पॅनेल करावयाचे ठरले. असे झाले जागावाटप….
भाजपचे अशोकअण्णा चराटी गट :- १० जागा (यामध्ये भाजपा, स्वाभिमानी संघटना, आमदार प्रकाश आबिटकर/ शिंदे गट यांचा समावेश )
राष्ट्रीय काँग्रेस (आमदार सतेज पाटील गट):- ८ जागा (यामध्ये जयवंतराव शिंपी गट- ४. गोकुळच्या संचालिका श्रीमती अजनालाई रेहेकर गट ३ व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे-१ जागा)
कारखान्याचे विदयमान अध्यक्ष व शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे गट-३ जागा
अधिकृत घोषणा आज गुरुवार रोजी होण्याची शक्यता ..
राष्ट्रवादी सुट्टीतून बाजूला गेल्यानंतर उर्वरित प्रमुख पक्ष बघताना भक्कम आघाडी बांधण्याचा प्रयत्न केला असून या आघाडीची अधिकृत घोषणा आज गुरुवारी होण्याची शक्यता आहे.
काही अपक्ष उमेदवारांची व सभा यांची भूमिका.
काही अपक्ष उमेदवार हे निवडणूक लागलीच पाहिजे फक्त तुम्हीच का संचालक व सभासद यांना संचालक कोण ठरवण्याची संधी द्या कारखान्याचे हित सभासदांना देखील समजतं व कोण संचालक असावं यासाठी सभासदांचा हक्क आहे निवडणुकीत मतदान करून संचालक ठरवण्याचे यामुळे हा निर्णय सभासदच घेऊन देत यामुळे आम्ही निवडणूक रिंगणातून बाहेर येणार नाही अशी भूमिका काही उमेदवारांची असल्याचे समजते.
