“शिवसेना (उ.बा.ठा.) आयोजित आजऱ्यात मोफत आरोग्य शिबीर संपन्न”
आजरा.- प्रतिनिधी.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्त साधत वि.मं.हत्तीवडे येथे शिवसेना (उ.बा.ठा.) आजरा व अथायु हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करणेत आले होते.



या शिबिरामध्ये हृदयविकार,मूत्रविकार, मुतखडा,हाडांचे विकार,कॅन्सर पूर्व लक्षणे या व्याधीसाठी तपासणी व मार्गदर्शन करणेसाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध होते. इ.सी.जी.रक्तातील साखर,रक्तदाब यांसह महालॅब गडहिंग्लज यांचेकडून मोफत रक्त तपासणी देखील करण्यात आली.आयुष्यमान भारत कार्डाची नोंदणी देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आली.या सर्व सुविधांचा लाभ हत्तीवडे सह होनेवाडी,मेंढोली,बोलकेवाडी गावातील जवळजवळ $$ ग्रामस्थांनी घेतला.विशेष म्हणजे जे जेष्ठ रुग्ण आहेत यांच्यासाठी ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय देखील करण्यात आली होती.
या मोफत आरोग्य शिबिरासाठी जिल्हाप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे, उपजिल्हा संघटक संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, यांसह पंचक्रोशीतील गावातील सरपंच,उपसरपंच सदस्य,प्रतिष्ठित नागरीक ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाप्रमुख प्रा.शिंत्रे यांनी या शिबिरासाठी उपस्थित राहून शिबीर यशस्वी करण्यासाठी राबलेल्या सर्वांचे कौतुक करत ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांची उपयुक्तता किती आहे याचे महत्व विषद केली.ग्रामीण भागात सर्वजण शेती या घटकावर अवलंबून असल्याने व आर्थिक सुबत्ता नसल्याने स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते प्रसंगी अनेक व्याधी विकारांची लागण होते अशातच वेळेत निदान न झाल्याने अनेकवेळा मृत्यू लाही सामोरे जावे लागते यासाठी गावखेड्यातील लोकांसाठी शिवसेनेचे ८०% समाजकारण २०% राजकारण हेच विकासाचे धोरण ठेवून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कृष्णा पाटील,विलास जोशीलकर, सुनील डोंगरे,राजकुमार भोगण,महेश पाटील,सुयश पाटील,अमर डोंगरे यांसह अनेक शिवसैनिक व युवासैनिकांनी परिश्रम घेतले.


