आता …सर्वच महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचा एकत्रीत राज्यव्यापी एल्गार.. – महामार्ग व प्रकल्प बाधीत शेतकरी संघर्ष समिती.- महाराष्ट्र राज्य.
पुणे.- प्रतिनिधी.

रविवार दि. १९ नोव्हेबर रोजी पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड मधील शेतकरी निवास हॉल मध्ये… राज्यभरातील विविध महामार्ग प्रकल्पासाठी बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्यभर विविध शेतकरी संघर्ष समित्या काम करतात.. त्यामध्ये प्रामुख्याने..
पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे बाधीत शेतकरी संघर्ष समिती..
सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे बाधीत शेतकरी संघर्ष समिती.
संकेश्वर बांदा महामार्ग शेतकरी संघर्ष समिती.. पुणे रिंगरोड शेतकरी संघर्ष समिती. अकोला नांदेड हायवे बाधीत शेतकरी संघर्ष समिती. पुणे नाशिक रेल्वे मार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती. पुणे नाशिक हायवे बाधीत शेतकरी संघर्ष समिती.. मुंबई नागपूर समृध्दी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती.. या सर्व शेतकरी संघर्ष समिती चे प्रमुख पदाधिकारी यांची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली..
कार्यशाळेत विविध महामार्गातील बाधीत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत विस्तृत चर्चा झाली..यावेळी..
सर्व समित्यांना एकत्रीत करून संयुक्त राज्यव्यापी….
महामार्ग व प्रकल्प बाधीत शेतकरी संघर्ष समिती. महाराष्ट्र राज्य. समिती करण्यात आली..
या समितीचे राज्यव्यापी निमंत्रक…म्हणून ..
भाई..दिगंबर कांबळे . कॉ .प्रा. दिनकर दळवी. कॉ. राजन क्षीरसागर. बाळासाहेब मोरे. राजाभाऊ चोरगे. नारायण विभुते, कॉ. शिवाजी गुरव. यांची सर्वानुमते निवड करण्यात आली..

बाधीत क्षेत्राचे योग्य मूल्यांकन वास्तववादी किंमत कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला भूमिहीन होणाऱ्या हायवे व प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांचे पुनर्वसन
या व इतर अनेक विषयावर सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
येणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर. राज्यभरातील महामार्ग व प्रकल्प बाधीत शेतकरी संघर्ष समिती. महाराष्ट्र राज्य च्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे..



राज्यव्यापी महामार्ग अधिवेशनात घेण्यात आलेले निर्णय..
यावेळी.. शरद पवार, प्रल्हाद गायकवाड, डॉ ओमन पाटील, विश्र्वास साखरे , नितीन साळुंखे, विनय कुंभार, प्रसाद घोनंद, प्रकाश केमसे, योगेश मांगले, राजाभाऊ गाढे, संतोष लोखंडे , गुलाबराव चौधरी, गोविंद घाटोड, मारोती मुंढे, धोंडीराम लांबाडे, सुरेश मानमोडे, विलास गावंडे, प्रशांत मानधने, संतोष दहातरे, जगदीश दहातरे , रमेश गावंडे. शिवाजी इंगळे, अनिल शिंदे, दिगंबर मोरबाळे, गणपती येसने. या सर्वांची राज्यव्यापी समन्वयक समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली…यावेळी मोठ्या संख्येने सर्व महामार्गा मधील शेतकरी संघर्ष समिती चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते… यावेळी रिंगरोड बाधीत शेतकरी संघर्ष समिती चे अध्यक्ष राजाभाऊ चोरगे यांनी सर्व शेतकरी पदाधिकारी याची जेवण चहा पाण्याची व्यवस्था केली होती..


