स्व. राजारामबापू देसाई यांचा सोळावा स्मृतिदिन विविध उपक्रमाने होणार साजरा.-
आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, आजरा तालुका संघाचे माजी अध्यक्ष व आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक स्व. राजारामबापू देसाई यांचा सोळावा स्मृतिदिन रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी यांनी दिली.

कै. राजारामबापू देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त आजरा येथे रक्तदान शिबिर होणार असून व फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजरा तहसीलदार समीर माने तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. यशवंत पाठणे साहित्यिक अध्यक्ष पुणे विभाग ग्रंथालय संघ कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकुंदराव देसाई, गोकुळचे माजी संचालक रवींद्र आपटे, विद्यमान संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, सौ.रचना होलम, कॉ. संपत देसाई, संभाजी पाटील, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, सुजय येजरे, अल्बर्ट डिसोजा, उदयराज पवार, आबासाहेब तकिलदार, काशिनाथ तेली सौ. कामिना पाटील, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, प्रा. पी. डी. पाटील, मनसे अध्यक्ष अनिल निऊगरे, यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वृषाल हुकेरी, युवराज पोवार, रवींद्र देसाई, तुकाराम प्रभू यांच्यासह कार्यक्रमाचे निमंत्रक जनार्धन बामणे गणपतराव सांगली व आजरा शेतकरी संघाचे चेअरमन विठ्ठलराव देसाई यांनी केले आहे.
