HomeUncategorizedअल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील तालुक्यातील ५ गावांना...

अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील तालुक्यातील ५ गावांना ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर /- आजरा कारखाना सद्या सलाईनवर आहे.- कारखाना निवडणूक बिनविरोध करावा सभासद शेतकऱ्यांची मागणी.

अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील तालुक्यातील ५ गावांना ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी प्रतिनिधी.

राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्यांक लोकसमुहातील नागरीकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण विकास योजनेतून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील ५ गावांतील विकास कामांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

राधानगरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण व नागरी भागातील नागरीकांना विविध पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या माध्यमातून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील ५ गावांतील विकास कामांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या ७५ लाख निधीमध्ये भुदरगड तालुक्यातील शेणगांव १५ लाख, गारगोटी २० लाख, राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली १५ लाख, कसबा वाळवे १५ लाख, तारळे १० लाख आदी निधी मंजूर झाला असून या गावातील विकासकामे मार्गी लागणार आहेत. मंजुरीबाबत अल्पसंख्याक विकास विभागाने दि.१८ ऑक्टोंबर २०२३ रोजी शासन निर्णय काढला आहे.

आजरा कारखाना सद्या सलाईनवर आहे.- कारखाना निवडणूक बिनविरोध करावा सभासद शेतकऱ्यांची मागणी.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखाना वाचवण्यासाठी व आजरा तालुक्याचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला कारखाना हे तालुक्याचे वैभव आहे. हा कारखाना सद्या सलाईनवर आहे. तो वाचण्यासाठी सर्व पक्ष गट तट बाजूला ठेवून उमेदवारांना एकत्र घेऊन जिल्ह्यातील जेष्ठ मंडळींनी यात लक्ष घालून कारखाना बिनविरोध करावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारखान्याची निवडणूक घेतल्यास कारखान्यावर ८० ते ९० लाख रुपये अधिकचा बोजा पडेल त्यामुळे कारखाना आणखीन तोट्यात जाणार हि भीती नाही. तर निश्चितपणे जाणारच आहे. जिल्ह्याचे मोठे नेते लक्ष घालतील अशी जनतेला आशा आहे, तरीपण बिनविरोधाचा प्रयत्न व्हावा यासाठी सामाजिक कार्य म्हणून सर्व सन्माननीय उमेदवार यांनी एकत्र यावे व चर्चा करावी असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ज्यांच्या मनात कारखाना खरोखर बिनविरोध व्हावा असे वाटते त्या उमेदवारांनी कृपया संपर्क करावा म्हणजे खरोखर बिनविरोधाची भूमिका कोणाची आहे. ते जनतेला कळेल. संपर्क नंबर- ९८६०११११६३३२ शिवाजी गुरव सर्व उमेदवारांना शेतकऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे की कारखाना वाचवण्यासाठी बिनविरोध कारखाना संचालक निवडी व्हाव्यात यातच सर्वांचे हित आहे. चर्चेसाठी जेष्ठ सभासद भाग घेणार आहेत. कृपया सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.