मराठा योध्दा मनोज जंरागे पाटलांच्या कोल्हापूरातील मराठा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शांततेत यावे.- जिल्हा समन्वय.- मारुती मोरे.
आजरा.- प्रतिनिधी.

मराठा योध्दा मनोज जंरागे पाटलांच्या कोल्हापूरातील मराठा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शांततेत यावे मराठा महासंघाचे जिल्हा समन्वय मारुती मोरे यांनी आजरा येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी श्री. मोरे म्हणाले मनोज जंरागे पाटील १५ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या भेटी घेण्यासाठी फिरणार असून शासनाला २४ जानेवारी पंर्यत अंतिम तारीख दिली आहे.

त्या अनुषंगाने १७ नोव्हेंबर रोजी दु. २ वा. शाहु महाराजांच्या समाधीला भेट देणार व सकल मराठ्यांच्या विनंती नुसार समालाला मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी दसरा चौक किंवा मोठ्या मैदानावर घेण्याचे नियोजन जिल्हा पातळीवर होत आहे.

कोल्हापूर दक्षिण विभागातील सहा तालुक्यातील मराठा बांधवांनी आपलं जेवण पाण्याची बाटली व आपली औषधे असतील तर सोबत घ्यावीत. आपल्या डोकीवर भगवी टोपी व भगवे टोपी व मपरल असावे व या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेती या मूळ व्यवसायावर मागील पन्नास वर्षे शेतात राबणाऱ्या व राबल्याशिवाय पोटाला न मिळणाऱ्या या शेतकऱ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजेत शासनाने याबाबत विचार नाही केल्यास भविष्यात मराठ्याच्या लढायला या शासन जबाबदार असेल यासाठी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत यामध्ये इतर कोणत्याही समाजाचे नुकसान होऊ नये तीन पक्षाचे सरकार असले तरीही समविचार व्हावा व आरक्षण द्यावे.

अशी मागणी ही यावेळी या पत्रकार परिषदेत श्री मोरे यांनी केली. यावेळी आजरा तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी शांततेत कोल्हापूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन ता. अध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी केले.


या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत देसाई, प्रकाश देसाई सरचिटणीस शिवाजी पाटील, शंकरराव शिंदे उपाध्यक्ष, तसेच सूर्यकांत आजगेकर शिवाजी इजल सह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मानले ता.अध्यक्ष चव्हाण यांनी मानले.

