HomeUncategorizedआजरा साखर कारखान्याचा २५ वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न.

आजरा साखर कारखान्याचा २५ वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न.

आजरा साखर कारखान्याचा २५ वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याच्या सन २०२३/२४ या २५ व्या गळीत हंगामाचा काटा पुजनाचा कार्यकम कार्यक्षेत्रातील प्रगतशिल शेतकरी किरण कृष्णाजी देशपांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कविता किरण देशपांडे रा.हाजगोळी बु. यांचे शुभहस्ते हस्ते संपन्न झाला. तसेच गळीत हंगाम शुभारंभ सोहळा दि. ४ रोजी चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचे शुभहस्ते पार पडला. सन २०२३/२४ या गळीत हंगामाकरीता ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिदष्ट असून त्यानुसार कारखान्यास आवश्यक तोडणी वाहतुकी साठी केलेली ६० टक्के यंत्रणा हजर झाली आहे. कारखान्यांने ठेवलेल्या उदिष्टा प्रमाणे ऊस उपलब्ध व्हावा या करीता आजरा, गडहिंग्लज, चंदगड या ठिकाणातील ऊस नोंदीचे काम पूर्ण झाले असून सदर ऊस गाळपाकरीता आणणेसाठी प्राधान्यांने स्थानिक यंत्रणा देखील लवकरच कार्यरत होणार आहे. त्यानुसार शेती खात्यामार्फत ऊसाची पहाणी केली जात आहे. कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने आणणेचे नियोजन शेती खात्यामार्फत केलेले आहे. कारखाना पुर्ण क्षमतेने चालविणेस सज्ज झाला आहे. कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक जाहिर झाली असली तरी कारखान्याचा गळीत हंगाम वेळेत सुरू करून गाळपाचे उदिदष्ठ पुर्ण करण्याचे नियोजन संचालक मंडळाने कर्मचा-यांच्या सहकार्यातुन केले आहे. कारखान्याकडे गाळपास येणा-या उसाची बिल वेळेत पोहोच करणेचे नियोजन कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या माध्यमातुन केले आहे. तरी उस उत्पादकांनी आपला पिकविलेला संपूर्ण उस कारखान्याकडे पाठवुन सहकार्य करावे अशी यावेळी संचालक मंडळाकडून विनंती करणेत आली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन सुनिल शिंत्रे, व्हाईस चेअरमन आनंदा कुलकर्णी, कारखान्याचे संचालक, अशोक चराटी, विष्णु केसरकर, वसंतराव धुरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संचालक मधुकर कृष्णा देसाई,दिगंबर देसाई, मारूती घोरपडे, संचालिका सौ. सुनिता रेडेकर, संचालक उदयसिंह उर्फ मुकुंदराव देसाई, दशरथ आनंदा अमृते,जनार्दन टोपले,मलिककुमार बुरूड, अनिल फडके, संचालिका सौ. विजयालक्ष्मी देसाई, विलास नाईक, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, व्ही.एच. गुजर जनरल मैनेजर (टेक्नि), एस. के. सावंत, जनरल मॅनेजर (प्रोडक्शन) शंकर आजगेकर सिव्हील इंजिनिअर, रमेश वांगणेकर, अकौंटंट, सुभाष भादवणकर, इन लेबर ऑफीसर, कामगार युनियन अध्यक्ष प्रकाश देसाई व युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.