कारखान्याचा बिनविरोध निवडणूक राजकीय ड्रामा / आजरा साखर कारखाना विद्यमान संचालकांची बिनविरोधची भूमिका.- मग अडचण कशाची.
आजरा.- संभाजी जाधव.
आजरा साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे निवडणुकीला सामोरे गेल्यास आणखी निवडणुकीचा अंदाजे खर्च ७० लाख रुपये बोजा कारखान्यावर लागेल व पुन्हा कारखान्याच्या कर्जामध्ये वाढ होईल यासाठी कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्यास आमची कोणतीही अडचण नाही अशीच प्रत्येक संचालकाची भूमिका आहे गटातटाच्या राजकारणात देखील बिनविरोधाचा प्रस्तावना सर्वांची पसंती आहेच मग अडचण कशाची आहे. असा प्रश्न सभासदांमध्ये उपस्थित होत आहे.
कारखाना अडचणीत आहे म्हणून सभासदांना दिवाळीच्या तोंडावर आजही साखर दिली जात नाही. सभासदांनी समजून घेतल यापेक्षा पर्यायी नाही कामगारांनी अर्ध्या पगाराच योगदान दाखवलं मग संचालक मंडळाची सर्वांची इच्छा बिनविरोध असताना मग बिनविरोधी बैठक का ? होत नाही.
परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ज्येष्ठ संस्थापक संचालकांचे मत आहे की १० वेगवेगळ्या विचारधारांचे विरोधातले संचालक एकत्र येऊन मन जुळू शकत नाहीत. यामुळे मागील कारखान्याचा इतिहास पाहता एकमेकांच्या कामात हस्तक्षेप व काम करून न देण्याचा यापूर्वी कार्यक्रम झाला आहे. कारखान्याला ऊस मिळू नये म्हणून देखील जबाबदार संचालक मंडळाने सातत्याने प्रयत्न केलेला आहे. असे एका गटाचे मत आहे. तर दुसरा गट कामगारांनी विरोधी गट कारखाना वाचवण्यासाठी दीडशे कोटी आणण्याचे आश्वासन देत आहे . तुम्ही काय करणार असा प्रश्न उपस्थित केल्यावर म्हणतो त्यांनी दीडशे कोटी आणावे मग आम्ही काय करायचं बघतो. पण आमची बिनविरोध निवडणूक व्हावी ही इच्छा आहे कारण कारखाना आर्थिक अडचणीत अडचण आहे अशी भूमिका राष्ट्रवादीची देखील आहे पण दोन्ही आघाडीने पॅनल ची रचना व नियोजन झालेले असल्याचे समजते.
मग बिनविरोधच्या नाट्यमय घडामोडी कशासाठी असा प्रश्न सभासदांच्या मध्ये उपस्थित होत आहे.
काही सभासदांची इच्छा आहे. निवडणूक लागलीच पाहिजे आम्ही ठरवतो कोणाच्या हातात सत्ता द्यायची मागील सर्व इतिहास आम्हाला माहित आहे.
त्यामुळे आता आम्ही ठरवणार आजऱ्याचं वैभव आम्हाला टिकवायचा आहे. त्यामुळे आता आम्हीच कोण निवडायचं ते निवडतो
फक्त निवडणुकीला सामोरे जावे.
त्यामुळे आता बिनविरोधचा राजकीय ड्रामा थांबवा असे काही सभासदांचे मत आहे.
सोमवार दि ६ पासून अर्ज भरण्याची सुरुवात आहे. अद्यापही सर्व संचालक एकत्र बसून वरिष्ठ नेते मंडळींचा विचार घेऊन बिनविरोधाचा चर्चेचा मार्ग काही दिसत नाही. मग सभासदांची दिशाभूल कशासाठी. व का? लोकशाहीच्या मार्गाने सभासदांच्या हातामध्ये कोणाला निवडायचं ठरवतील व तो अधिकार आहे. तोच अधिकार त्यांना दिला पाहिजेत. एक तर बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे नाहीतर त्या वक्तव्याला पूर्णविराम द्यावा. पण सभासद निश्चितपणे जाणून आहेत. आजरा साखर कारखान्याची निवडणूक लागणारच मात्र निश्चित आहे.
