निकोप माणसाच्या हातात आजरा कारखान्याची सत्ता गेली पाहिजेत.- माजी चेअरमन जयवंत शिंपी. ( अडीच टनाची बेरिंग ती हाताने उचलता येत नाही. ती कुठे गेली हे चोर कोण आहेत. याचाही तपास झाला पाहिजेत.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. ही आमची ही भूमिका आहे. परंतु निवडणूक झाल्यास सभासदांनी निकोप माणसांच्या हातात सत्ता द्यावी. आजरा येथे शिंपी व चराटी गटाची आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद झाली. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचा आजरा कारखान्या बाबत मेळावा संपन्न झाला. तत्पूर्वी चराटी व शिंपी यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या संचालकांनी उत्तर दिले होते. त्या अनुषंगाने दि.३ रोजी चराटी व शिंपी गटाची पत्रकार परिषद होती. यावेळी अध्यक्ष स्थानावरून माजी चेअरमन जयवंत शिंपी बोलत होते.
दहा विचारांची लोक एकत्र आल्यास कारखाना सुरळीत चालण्यास अडचण निर्माण होते. हा मागील इतिहास आहे. यासाठी दहा विचारांची लोक नको. केंद्रातून निधी आणणे हा देशव्यापी प्रश्न आहे. देशातील २० कारखान्यांना जे आर्थिक अडचण आहेत. त्यांना केंद्र सरकार मदत करण्याच्या भूमिकेत आहे. आमच्या हातात सत्ता दिल्यास आम्ही कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू याचा अर्थ असा नाही. अगोदर दीडशे कोटी आणा व कारखाना तुमच्या ताब्यात देऊ असा होत नाही. असे प्रश्न उपस्थित करणारे कारखाना उभा करताना हे कुठे होते. याचाही विचार व्हावा. अडीच टनाची बेरिंग ती हाताने उचलता येत नाही. ती कुठे गेली हे चोर कोण आहेत. याचाही तपास झाला पाहिजेत. असे असताना कर्तव्य शून्य व योगदान नसणाऱ्यानी दुसऱ्या वरती आरोप करू नये. असे यावेळी बोलताना श्री शिंपी म्हणाले.
यावेळी माजी चेअरमन अशोक चराटी म्हणाले मुळात मी दीडशे कोटी आणतो असे म्हटलेच नाही कारखाना सभासदांनी कामगारांनी आमच्या ताब्यात दिल्यास आम्ही कारखाना केंद्रातून निधी आणून कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू असे म्हटले होते. मी चेअरमन असताना व कारखाना अडचणीत येत असताना संचालकांना घेऊन मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेलो असता काही संचालकाने मदत केल्यास आम्ही सह्या करणार नाही. आमची संमती नसेल असे सांगितले कारखाना बंद पडू नये म्हणून दिगंबर देसाई यांनी चांगली पार्टी आणली होती. त्यांनाही विरोध करून परत पाठवली आजही आमची भूमिका मंत्री हसन मुश्रीफ आम. सतेश पाटील, आम. विनय कोरे व स्थानिक आमदार नेते मंडळी आमदार यांच्याशी कारखाना बिनविरोध व्हावा. यासाठी चर्चा करणार आहोत. कारखाना फक्त उसावर चालणार नाही. यासाठी डिस्लरी प्रकल्पाला मंजुरी घेतली मंजुरी मिळाली पण ती रद्द झाली कारखान्याचे चांगले दिवस यायला पाहिजे असतील तर नवा प्रोजेक्ट झाला पाहिजे. सध्या हंगाम संपल्यानंतर हंगामाला मिळालेले दिवस व क्रशिंग किती झाले व मी चेअरमन असताना काही संचालकांनी ऊस उत्पादकांना ऊस घालू नये म्हणून काम केले त्यावेळचे क्रॉसिंगचा अभ्यास करावा. मग विरोधकांनी बोलावे असे श्री चराटी बोलताना म्हणाले.
यावेळी मलिककुमार बुरुड म्हणाले कर्मचाऱ्यांचा संसार चालावा म्हणून अशोक चराटी यांनी कामगारांचा पगार वेळेत व्हावा यासाठी प्रयत्न केला अंतर्गत गटबाजीचे राष्ट्रवादीचे १० संचालक प्रोसिडिंगवर सह्या करत नव्हते कागदपत्रे पुरवठा करताना देखील सह्या न करता विरोध करायचे संचालक असतानाही दुसऱ्या कारखान्याला ऊस जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत चांगल्या कामात नेहमी आडवा पाय मारण्याचा प्रयत्न केला व विघ्न संतोषी संचालकांना हाताशी धरून कारखान्याचा चराटी यांच्याकडून राजीनामा घेतला व कारखाना बंद पडला. ३८ कोटी कर्ज होते ते ७० कोटी झाले यानंतर १०० कोटी व गेलं दरम्यान आमच्या प्रयत्नातून २६ कोटीची व्यवस्था केली. यामध्ये स्वामी विवेकानंद, आजरा अर्बन, व हितसंबंधातून तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीस कोटी आम. सतेज पाटील आणि दहा कोटी.
यांनी फक्त कारखान्याचे कर्ज वाढवण्याचे पद्धतशीर नियोजनबद्ध काम केले. आजरा कारखाना आमचं वैभव आहे राज्यातील आदर्श आहे भविष्यात यापेक्षाही मोठा निधी आणू व कारखाना चालू आमची आजही बिनविरोधचा प्रस्ताव आहे असे श्री बुरुड म्हणाले.
संचालक दिगंबर देसाई म्हणाले अशोक अण्णा चेअरमन असताना कारखान्याच्या सभासदांना प्रत्येक गावातील सेंटरवर साखर देण्याचे काम केले कारखाना सुरळीत चालू होता परंतु साडेतीन कोटीचा हप्ता थांबला व यासाठी मदत मागताना पैसे देऊ नये म्हणून विरोध केला पण आम्ही आज ही कारखाना बंद पडावा या दृष्टीने कोणताही प्रयत्न केला नाही कारखाना व्यवस्थित चालावा यासाठी आम्ही आजही सातत्याने प्रयत्न करतो व मदत केली आहे. विरोधी संचालकांनी कोणताही निधी आणला नाही साखरेचे दर वाढले असताना सभासदांना साखर देऊ शकेल नाहीत बेरिंग प्रकरण घसारा लावले असते तर चोरीचा तपास लागू शकला असता अद्याप तपास का ?लागू शकला नाही. वसंतराव धुरे किती मिटींगला हजर होते ते सांगावे यासाठी आपले योगदान काय हे स्वतः तपासावे असे श्री देसाई म्हणाले.
जनार्धन टोपले यांनी मागील कार्यकाळात झालेल्या घडामोडी काही संचालकाकडून कारखाना बंद पडावा व कारखान्याला ऊस जाऊ नये ही अडवणूक व दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करत नेहमी विरोध करून कोणत्याही योगदान नसताना फक्त नेहमी विरोध केला आहे. डिस्लरी प्रकल्पाचे काय झाले आम्ही विरोध केला नव्हता अडचण येऊ नये कारखाना बंद पडू नये हीच आमची भूमिका होती. व आजही कारखाना बिनविरोध व्हावा हीच आमची भूमिका आहे असे श्री टोपले म्हणाले.
यावेळी अतिशकुमार देसाई म्हणाले कारखाना आर्थिक अडचणीत असताना तीन हजार नव्याने सभासद करून दीड कोटी उपलब्ध करून दिले व काही संचालकांनी राजकीय हेतूने तक्रार करून या सभासदांचा नोटीस न देता अधिकार काढून घेतला व सभासदांचे पैसे परत न देता वापरले यासाठी आम्ही त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी हायकोर्टात दाखल केले आहे त्याचा निकाल लवकरच येऊन त्या तीन हजार सभासदांना मतदानाचा अधिकार मिळेल. यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. तर सुनीता रेडेकर यांनी यापूर्वी घडलेल्या घटना व घडामोडी वेळ आल्यानंतर नक्कीच व्यासपीठावर मांडणार असल्याचे सांगितले.
विलास नाईक यांनी मागील कारभाराचा आढावा घेत आभार मानले.
