HomeUncategorizedकारखाना बिनविरोध व्हावा ही भूमिका व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही.- कारखान्याच्या हितासाठी. चेअरमन. शिवसेना...

कारखाना बिनविरोध व्हावा ही भूमिका व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही.- कारखान्याच्या हितासाठी. चेअरमन. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे.🛑आमदारांच्या दत्तक गावच्या स्मशानभूमीत मोबाईल बॅटरीवर होते अंत्यविधी.- कागल विधानसभा – मडिलगेतील दुर्लक्षित बाब.🛑आर. आर.(आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार अभियान अंतर्गत.- आजरा खानापूर खानापुर या गावाची केली प्रत्यक्ष पाहणी.

🛑कारखाना बिनविरोध व्हावा ही भूमिका व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही.- कारखान्याच्या हितासाठी. चेअरमन. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे.
🛑आमदारांच्या दत्तक गावच्या स्मशानभूमीत मोबाईल बॅटरीवर होते अंत्यविधी.- कागल विधानसभा – मडिलगेतील दुर्लक्षित बाब.
🛑आर. आर.(आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार अभियान अंतर्गत.- आजरा खानापूर खानापुर या गावाची केली प्रत्यक्ष पाहणी.

आजरा.- प्रतिनिधी.

कारखाना बिनविरोध व्हावा ही भूमिका व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही.- कारखान्याच्या हितासाठी. चेअरमन. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे.

कारखाना बिनविरोध व्हावा ही भूमिका व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही. तर आजरा कारखान्याच्या हितासाठी आहे. यासाठी सर्वांचे सहकारी राहिल्यास बिनविरोध करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. अशी भूमिका आजरा साखरचे चेअरमन व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे. यांनी आजरा येथे दि. ३ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. स्वागत व प्रास्ताविक तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी केले.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिंत्रे म्हणाले सद्यस्थितीला कारखाना आर्थिक अडचणीत आहे. यामध्ये चालू पावसाळ्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. व आता चालू होणारा हंगाम हा किमान ९० दिवसाचा असेल या ९० दिवसांमध्ये क्रशिंग जादा कसे होईल सोबत डिस्लरी प्रकल्प कसा उभा राहील याकडेही लक्ष दिले पाहिजेत व या सर्व गोष्टी विचारात घेऊन वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्याने कारखाना बिनविरोध झाल्यास कारखान्यावर निवडणुकीचा पडणारा बोजा अंदाजे ७० लाख रुपये वाचणार आहे. यासाठी नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ, खास. संजय मंडलिक, माजी खास. राजु शेट्टी, आम. राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, विनय कोरे यांना भेटून विचार घेऊन कारखाना बिनविरोध व्हावा. यासाठी प्रयत्न व विनंती करणार आहे. सोबत सर्व माजी चेअरमन व्हा. चेअरमन यांच्याशी संपर्क साधण्यात येईल परंतु कारखाना बिनविरोध व्हावा. हाच प्रयत्न राहील मागील हंगामात शेतकरी तोडणी ओढणी कामगार पगार शिल्लक ठेवला नाही. पण निवडणुका लागल्यास निवडणुकीचा खर्च कारखान्यावर पडेल व पुन्हा आर्थिक अडचणीत येईल यासाठी सर्वांनी विचार करावा व बिनविरोध निवडणुकीसाठी पुढे यावे असे आवाहन चेअरमन श्री शिंत्रे यांनी पक्ष व चेअरमन अशी भूमिका मांडली.

चौकट.

यावेळी माजी चेअरमन व आम. कै वसंतराव देसाई यांच्या दोन कन्या सौ. मंजुशहा इंगवले, व सरोज सरनाईक या पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या. त्यांनी आपले मत मांडले कि.- मागील अनेक वर्षापासून वसंतराव देसाई यांच्या कुटुंबाचा विचार आजपर्यंत केलेला नाही आम्ही वेळोवेळी कै. वसंतराव देसाई यांचे कारखान्याला नाव द्यावे अशी मागणी केली होती. ती आता पूर्ण झाली परंतु आम्हाला न विचारता राजकारणासाठी निवडणुकीत पॅनल ची रचना करत असताना कै. वसंतराव देसाई पॅनलचे नाव आमच्या परवानगीशिवाय देऊ नये. यामध्ये आमचा कोणत्याही राजकारणाशी संबंध नाही. कामगार व सभासदांच्या कारखान्याच्या हितासाठी सर्व संचालकानी व जिल्ह्यातील मदत करणाऱ्या नेत्यांनी विचार करून बिनविरोध साठी प्रयत्न करावा. या बिनविरोध प्रक्रियेमध्ये आमची देसाई कुटुंबाची मदत लागल्यास आम्ही मदत करायला तयार आहोत. पण कारखाना बिनविरोध करा अशी भूमिका कै. वसंतराव देसाई यांच्या कन्या सौ इंगवले व सरनाईक यांनी मांडल्या.

यावेळी निवडणूक लागल्यास किंवा बिनविरोध प्रक्रियेमध्ये आपण संचालक होण्यास तयार आहात का ? अशी विचारणा केली असता.- आज पर्यंत कोणीही आमचा विचार केला नाही. आता विचार केल्यास आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले.
या पत्रकार परिषदेत उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुकाप्रमुख व कारखाना संचालक राजेंद्र सावंत, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, विभाग प्रमुख सुनील डोंगरे दिनेश कांबळे महिला आघाडी सौ देसाई पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा सेनेचे कृष्णा पाटील यांनी आभार मानले.

आमदारांच्या दत्तक गावच्या स्मशानभूमीत मोबाईल बॅटरीवर होते अंत्यविधी.- कागल विधानसभा – मडिलगेतील दुर्लक्षित बाब.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील व कागल विधानसभेला जोडलेले मडिलगे हे गाव तस छान लोकसंख्येनही महान व विकासकामांसाठी अग्रेसर अस हे गाव पण या गावात रस्ते विकासासोबत पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचे दत्तक गाव असल्याने विकासाला अजिबात कमी नाही. विकास कामातून भरपूर विकास साधला आहे. सोबत नेत्यांचाही राजकीय विकास झाला परंतु महावितरण कडून स्मशानभूमीत रात्री अपरात्री मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी स्टेट लाईटची व्यवस्था अद्याप झाली नाही. व स्मशानभूमीत प्रकाश पाडण्यासाठी नेत्याच्या डोक्यात अजून प्रकाश पडला नाही. यामुळे अंत्यविधी हा मोबाईल व बॅटरी च्या साह्याने करावा लागत आहे. ही शोकांकिता आहे. यासाठी महावितरण कडून पोल टाकून स्मशानभूमीत प्रकाश पडल्यास रात्री अपरात्री अंधारातून जाण्याचा मार्ग व अंत्यविधी दरम्यान प्रकाशाची अडचण उद्भभवणार नाही.
या मार्गाकडे जाणारा रस्ता, ओढ्यावरील साकव झाल्याने पावसाळ्यात ओढ्याच्या पाण्यातून जाण्याचा नागरिकांना त्रास कमी झाला आहे या गोष्टीचे कौतुकच आहे. पूर्वी रस्ता नव्हता साकव नव्हते स्मशानभूमी नादुरुस्त होते आता सर्व काही असताना प्रकाशाची गरज मात्र भासत आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर महावितरण कडून विद्युत पोल व स्टेपलाईट यासाठी प्रयत्न झाल्यास स्मशानभूमीत प्रकाश पाडण्यास वेळ लागणार नाही. याबाबत नागरिकांच्या कडून मागणी होत आहे. स्मशानभूमी परिसरात ग्रामपंचायत स्तरावर लाईटची व्यवस्था व्हावी.

आर. आर.(आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार अभियान अंतर्गत.- आजरा खानापूर खानापुर या गावाची केली प्रत्यक्ष पाहणी.

आजरा.- प्रतिनिधी.

दुर्गम खेड्यातील प्रयोगशील शेतकरी म्हणजे कृषी विद्यापीठातील एक शास्त्रज्ञच” जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचे प्रतिपादन.आर. आर.(आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार अभियान अंतर्गत, आज कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आजरा तालुक्यातील खानापुर या गावाची प्रत्यक्ष पाहणी केली. याआधी तालुकास्तरीय पहिला क्रमांक आला आहे, या समितीने निकषाप्रमाणे सर्वच बाबींची सखोल तपासणी केली. कृषी पदवीधर असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यानी या व्यतिरिक्त या गांवात कोण शेतकरी प्रयोगशील शेती करत असल्यास त्याच्या शेतीस भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. यानुसार या गावातील एक तरुण, होतकरू व प्रयोगशील शेतकरी रामदास पाटील यांच्या शेतीस भेट दिली. या शेतकऱ्याने दोन महिन्यापूर्वी १८ गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या विदेशी फळभाजी पिक ” झुकिणी” विषयी सविस्तर माहिती घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. हा शेतकरी वर्षभरात त्याच्या ०३ एकर शेती मध्ये रोटेशनप्रमाणे अन्नधान्ये,भाजीपाला, फळपिकांची लगवड करत असतो. त्याने आत्तापर्यंत कलिंगड, स्ट्रॉबेरी, हळद इ. पिकांची यशस्वी लागवड केली आहे. सद्या लागवड केलेल्या झुकिणी ची फळे दररोज मुंबई येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवीत असल्याचे त्यांनी सांगितले. या फळांना प्रती किलो रु.४५/- भाव मिळत असून ही शेती फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर मा. श्री. संतोष पाटील यांनी ग्रामपंचायत कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर गावामध्ये प्रत्यक्ष पाहणी करुन प्रा.शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा योजना,बचत गटाचे कामकाज, वृक्ष लागवड,पाझर तलाव,स्मशानशेड,वाचनालय ,व्यायाम शाळा,बगीचा,नेडेप प्रकल्प, बंदिस्त गटर,बायोगॅस प्रकल्प ,सार्वजनिक शोष खड्डे,प्लास्टिक संकलन केंद्र,व वनराई बंधारे ई. बाबत ही सविस्तर माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
यानंतर उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना ते म्हणाले की, या गावाने निकषांनुसार सर्व उपक्रम अतिशय उत्कृष्टपणे राबविले आहेत. “तसेच या दुर्गम खेड्यातील एका तरुण शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न लागता प्रयोगशील व निर्यातक्षम शेती करुन सर्वांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या शेतकऱ्याची प्रयोगशीलता व त्याचा या क्षेत्रातील अभ्यास पाहता हा शेतकरी म्हणजे कृषी विद्यापीठातील एक शास्त्रज्ञच आहे.”यावेळी जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, विस्तार अधिकारी कटारे, गट विकास अधिकारी श्री. सुभाष सावंत, सहायक गट विकास अधिकारी दिनेश शेटे, उपअभियंता, पी.डी.माने, सूर्यकांत नाईक, गटशिक्षण अधिकारी श्री.गुरव, वि. अ. कृषी श्री. आबा मासाळ, विविध खाते प्रमुख, सरपंच सौ.कल्पना डोंगरे, उपसरपंच आनंदा राणे, ग्रा प सदस्य श्री.विश्वास जाधव,माधुरी गुरव,अलका चव्हाण,सुशीला जाधव, सीताबाई दोरुगडे,धनाजी डोंगरे, ग्रामसेवक श्री.विशाल दुंडगेकर व खानापूर रायवाडा, कासारशेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गौतम कांबळे सर यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.