कोयना धरणग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा.
【 तालुक्यातील धरणग्रस्तांचे घरासमोर आंदोलन. 】
आजरा. प्रतिनिधी.दि. २६.
आजरा तालुक्यात श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने
कोयना धरण पूर्ण होऊन साठ वर्षे झाली तरी धरणग्रस्तांचे पुनर्वसन मात्र अजूनही झालेले नाही. गेले बारा दिवस सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यात नेऊन टाकलेले पन्नास हजारहून अधिक धरणग्रस्त श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ भारत पाटणकर व कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत. कोरोनाच्या काळात एकत्र न जमता आपापल्या गावी घरासमोर सुरक्षित अंतर ठेवून सर्व नियम पाळून आंदोलनास बसले आहेत. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होऊन कोयना पुनर्वसनासाठी टास्क फोर्स स्थापना केली. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासोबत बैठक होऊन १ मे ला संकलन मंजुरीसह जमीन वाटप ठरले होते. पण त्याची पूर्तता मात्र झाली नाही. म्हणून श्रमुदच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आजरा तालुक्यातील धरणग्रस्तांनी पाठिंब्यासाठी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करून पाठिंबा दिला. कोयना धरणग्रस्तांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आजरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरतील असा इशाराही कॉम्रेड संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलकांनी दिला.
