Homeकोंकण - ठाणेमराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या दोन खासदाराच्या राजीनाम्यानंतर.- आता कॉंग्रेस आमदाराने दिला राजीनामा…/...

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या दोन खासदाराच्या राजीनाम्यानंतर.- आता कॉंग्रेस आमदाराने दिला राजीनामा…/ विजयनगरम मधील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर…🟥अपघातातील मृतांची संख्या १४…

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या दोन खासदाराच्या राजीनाम्यानंतर.- आता कॉंग्रेस आमदाराने दिला राजीनामा…/ विजयनगरम मधील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर…🟥अपघातातील मृतांची संख्या १४…

मुंबई.- प्रतिनिधी.

💥राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात जोर धरत असून राज्यातील दोन खासदारांनी राजीनामा दिला असल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. काल एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर आणखी शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मराठा आरक्षणासाठी थेट खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तर बीडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द देखील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

तर आता कॉंग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनीही विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आमदार सुरेश वरपूडकर यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांना सुपूर्द केल्यानंतर नाना पाटोळे यांनी त्यांची समजूत काढली.

नाना पटोले यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. या अधिवेशनात आरक्षणाबाबतची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी श्री सुरेश वरपूरकर यांनी विधानसभेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. हे त्यांना पटवून सांगितले. आरक्षणाच्या विविध प्रश्नांची तड लागण्यासाठी आमदारांनी विधानसभेत आपला आवाज बुलंद करावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

विजयनगरम मधील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर…🟥अपघातातील मृतांची संख्या १४…

आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. वॉलटेअर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले की, विशाखापट्टणम-रायगड ट्रेनच्या लोको पायलटने चुकून रेड सिग्नल ओलांडला होता, त्यामुळे ही ट्रेन विशाखापट्टणम-पलासा ट्रेनला धडकली. विशाखापट्टणम-पलासा ही विशाखापट्टणम रायगड ट्रेन सुद्धा त्याच ट्रॅकवर होती. सौरभ प्रसाद म्हणाले की, दोन्ही गाड्यांमध्ये कवच यंत्रणा नव्हती.

ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ बिस्वजित साहू यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे. आता ट्रॅकवर रेल्वेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यावर भर आहे. अपघातामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी बस आणि ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघातामुळे आतापर्यंत एकूण 18 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 22 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत बाधित मार्गावरील गाड्या पुन्हा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

🟪अपघाताचा तपास करण्यात येत आहे

वॉलटेअर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले की, अवजड यंत्रे आणि क्रेन मागवण्यात आल्या आहेत. राज्य सरकार आणि अग्निशमन विभाग यांच्या समन्वयाने हे काम सुरू आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि मध्यम जखमींना 50 हजार रुपयांची मदत रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी वॉर रूममधून अपघाताचा आढावा घेतला.

विजयनगरमचे एसपी म्हणाले की, रेल्वे अपघातात ठार झालेल्यांपैकी सात जणांची ओळख पटली असून इतर मृतदेहांचीही ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतील रेल्वे भवनच्या वॉर रूममधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रेल्वेमंत्र्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशीही फोनवर चर्चा केली.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.