🟥आंबोलीत पिसाळलेल्या हत्तीने वन कर्मचाऱ्याला सोंडेने उचलून आपटत पायदळी चिरडले…तर हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचाऱी प्रकाश गोविंद पाटील यांचा झाला जागीच मृत्यू.- आंबोली घाटकरवाडी परिसरात घडली घटना..
आजरा.- प्रतिनिधी.
आंबोली घाटकरवाडी परिसरात स्थिरावलेल्या हत्तीच्या हल्ल्यात घाटकरवाडी येथील वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील वय 54 याना हत्तीने सोंडेने उचलून आपटल्याने आणि पाय दिल्याने जागीच मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी घाटकर वाडी(ता.आजरा) येथे ग्रामस्थांसोबत हत्ती हुसकवताना घडली.
👉🅾️🅾️👉हा टस्कर हत्ती गेली काही वर्षे आंबोली हद्दीवर स्थिरावला आहे.तो आक्रमक झाला आहे.आज घटनेने वनविभागाला आता गंभीरपणे याकडे बघण्याची आवश्यकता आहे.
