HomeUncategorizedपायाभूत शाळेचा पाया मजबूत केल्याशिवाय लाँग मार्च थांबणार नाही. - काँ संपत...

पायाभूत शाळेचा पाया मजबूत केल्याशिवाय लाँग मार्च थांबणार नाही. – काँ संपत देसाई.( शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानापर्यंत लाँग मार्चला सुरवात.)

पायाभूत शाळेचा पाया मजबूत केल्याशिवाय लाँग मार्च थांबणार नाही. – काँ संपत देसाई.
( शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानापर्यंत लाँग मार्चला सुरवात.)

आजरा.- प्रतिनिधी.

शाळा बचाव समितीच्या वतीने विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर दि.शनिवार दि २८ रोजी आजरा येथून शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानापर्यंत लाँग मार्चला सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी बारा वाजता या लाँग मार्चला सुरुवात झाली.

असून या लाँग मार्चमधील प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने.

१. राज्यातील २० पटसंख्येपेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण सांगून अशा शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे. गाव, तांडा, वाडी, वस्ती तिथे शाळा हेच धोरण कायम ठेवले पाहिजे. एक (१) विद्यार्थी असला तरी ती शाळा चालू ठेवली पाहिजे.
२. शासकीय शाळांच्या सक्षमिकरणासाठी आवश्यक असलेले शिक्षक, सुसज्ज इमारती, ग्रंथालय, अभ्यासिका खेळाचे मैदान यासह गरजेच्या असलेल्या सर्व सुविध शासकीय शाळांना तात्काळ दिल्या पाहिजेत.
३. गेल्या दहा वर्षांत शिक्षक भरती केलेली नसल्याने
राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विषय शिकवायला शिक्षक नाहीत. कला, क्रीडा शिक्षकांसह ही रिक्त पदे तातडीने भरली जावीत.
४. शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे शिक्षकांना देणे बंद केले पाहिजे.. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून मानधन तत्वावर कंत्राटी शिक्षक भरती करण्याची तरतूद
५. शिक्षण हक्क कायद्यात आहे. ही नवी वेठबिगारी असून त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणार असल्याने ही प्रक्रिया तातडीने थांबली पाहिजे. तशी दुरुस्ती कायद्यात केली पाहिजे.
६. कंत्राटी पद्धतीने चालवलेली शासकीय नोकर भरती तातडीने थांबवली पाहिजे.
शनिवार दि.२८ रोजी दुपारी १२ वाजता शिवाजी पुतळा आजरा येथून महाराजांना पुष्पहार अर्पण करून लाँग मार्चला सुरूवात झाली. यावेळी काँ. संपत देसाई, संजय तर्डेकर, माजी जि. प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, राष्ट्वादीचे ता. अध्यक्ष मुकुंदराव देसाई, के. डी. सी संचालक सुधीर देसाई, शिवसेनेचे संभाजी पाटील, युवराज पोवार, तसेच निवृत्ती कांबळे, काँ. शिवाजी गुरव, शांताराम पाटील, मारुती मोरे, चंद्रकांत सरदेसाई सरपंच संघटनेचे पदाधिकारी आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी माता पालक सह हजारो महिला नागरिक सहभागी होत लॉन्ग मार्चला सुरुवात झाली ती सावंतवाडीच्या दिशेने.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.