🛑बिगरशेती (एन. ऐ ) बाबतीत”संघर्ष मोर्चा” – आजरा तहसिलवर “बेमुदत ठिय्या आंदोलन” मुक्ती संघर्ष समिती – संग्राम सावंत./ 🛑मडिलगेत श्री. सरस्वती वाचनालय आयोजित वाचन प्रेरणा दिवस संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.

बिगरशेती (एन. ऐ ) बाबतीत”संघर्ष मोर्चा” व आजरा तहसिलवर “बेमुदत ठिय्या आंदोलन” करणार असल्याचे मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात येणार आहे. याबाबत संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्लॉट धारक व मुक्ती संघर्ष समिती यांनी उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मागण्यांबाबत दि.१ नोव्हेंबर २०२३ रोजी छ.शिवाजी महाराज पुतळा ते तहसिलदार कार्यालय आजरा जि.कोल्हापूर येथे “संघर्ष मोर्चा” काढून तहसिलदार कार्यालय आजरा यांच्या आवारात “बेमुदत ठिय्या आंदोलन” मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने करणार आहोत असे संग्राम सावंत राज्याध्यक्ष – मुक्ती संघर्ष समिती यांनी सांगितले आहे. बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील सर्व बिगरशेती NA गट क्रमांक यामध्ये निवासी रहिवासाकरीता अकृषक (NA) प्लॉट तयार करून जागा मालकांनी विक्री केली. पण येथे पायाभुत सुविधा दिलेल्या नाहीत. त्या सुविधा द्याव्यात अशी मागणी येथील रहिवाशांनी या केलेली आहे व होती. याबाबतचे याअगोदर भावेश्वरी कॉलनी, बुरूडे आजरा जि.कोल्हापूर येथील रहिवाशांनी निवेदन आजरा तहसीलदार, आजरा यांना दिलेले आहे.मात्र यावर ठोस कार्यवाही केली नाही. संबंधित जागा मालकांनी प्लाट अकृषक(बिगरशेती-NA) करून राहण्यासाठी विकले. पण तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा या पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. संबंधीत जागामालकांनी अशा कोणत्याही सेवासुविधा न देता या प्लॉटमधील रहिवाशांची फसवणूक केली आहे. सध्या आपआपल्या खरेदी प्लॉटमध्ये नागरिकांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत. परंतु घरांचे सांडपाणी किंवा ये जा करण्यासाठी रस्ते किंवा लाईट्स याची कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन आम्हा रहिवाश्यांना मंडळ अधिकारी गेले आहेत.पण न्याय मिळाला नाही.यासाठी खालील मागण्यांबाबत आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहोत.
आमच्या मागण्या –
१) .बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील येथील रहिवाशी लोकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत.भावेश्वरी कॉलनीमधील संबंधित जागा मालकांनी रहिवाशी प्लॉटधारकांना अकृषक (बिगरशेती) NA करून राहण्यासाठी विकले. पण तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा या पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. NA प्लॉटधारकांना रस्ता व गटर्स यांच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांना पावसाळ्यात व इतर ऋतूमध्ये नाहक त्रास होत आहे. यासाठी त्या कॉलनीमध्ये ताबडतोब रस्ता व गटर्स व इतर पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत.त्यांचा तो अधिकार आहे.
२).तत्कालीन नायब तहसिलदार डी.डी.कोळी यांच्या सह्यांच्या आधारे त्यांच्या काळातील सर्व बिगरशेती (N.A. ) प्रकरणांची कायदेशीररित्या चौकशी करून.त्यांच्यासह संबंधित शिवराज देसाई तलाठी व सर्कल पाटील साहेब आणि इतर सर्व संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत!
३).खालील मुद्दांच्या आधारे आजरा तालुक्यातील जि. कोल्हापूर येथील सन-२०१० ते सन -२०२३ आजपर्यंत बिगरशेती NA केलेल्या तालुक्यातील सर्व गट नंबर प्रकरणांची परिपूर्ण चौकशी झाली पाहिजे! तसेच बिगरशेती NA सर्व गट नंबर मधील फेरफार कसे घातले आहेत. याबाबतीत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी आणि NA संदर्भातील आदेश (ऑर्डर) कशा झालेल्या आहेत. याबाबतीत तत्कालीन सर्व तहसिलदार याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
४) आता पर्यंत मा.उपविभागीय अधिकारीसो, गारगोटी जि.कोल्हापूर आणि मा.तहसिलदारसो, आजरा यांनी केलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट पुराव्यानिशी अहवाल सादर केला आहे की नाही.याबाबतीत खुलासा मिळणे बाबत….
५.वरील तिन्ही विषयांच्या, खालील मुद्द्यांच्या आधारे मा.उपविभागीय अधिकारीसो, आजरा भुदरगड उपविभाग, गारगोटी जि.कोल्हापूर यांनी “चौकशी समिती” नेमून याबाबतीत कार्यवाही व कारवाई करण्यात यावी .
तसेच वरील विषय क्रमांक -२ व ३ नुसार,खालील मुदयांच्या आधारे कोल्हापूर जिल्ह्या आजरा तालुक्यातील सर्व बिगरशेती (N.A.) प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.सर्व संबंधित दोषींवर कारवाई केली पाहिजे.त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.
(१) बिगरशेती करण्यासाठी आलेले गट नं, अर्ज व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची चौकशी व्हावी!
(२) डी. डी. कोळी तत्कालीन नायब तहसिलदार यांच्याकडे तहसिलदार, आजरा म्हणून कार्यभाग असताना बिगरशेती प्रकरणांचे आदेश, मंजूरी व त्यासंदर्भात झालेला पत्रव्यवहार आणि कागदपत्रांची सखोल तपासणी करावी!
(३) बिगरशेती (N.A) करताना करावयची परिपूर्ण कार्यवाही झालेली आहे का? याची चौकशी व्हावी-
अ) डाउन प्लॅनिंगची मंजूरी आहे का?
बं) बिगरशेती करताना वरिष्ठांचे आदेश बेतले आहेत का? क) ओपन स्पेस व इतर गोष्टी आणि रस्त्यासाठी जागा सोडल्या आहेत का?
ड) बिगरशेतीसाठी नियमानुसार नकाशा तयार केला आहे का? लेआउट मंजूर आहे का?
(४) सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून केलेल्या बिगरशेती (N.A.) प्रकरणांच्या आदेशांची चौकशी करा!
(५) ग्रीन झोनमध्ये झालेल्या बिगरशेती (N.A.) प्रकरणांच्या आदेशांची चौकशी करा!
(६) बिगरशेती (N.A.) करताना कोणकोणाच्या N. O. C. नाहरकत प्रमाणपत्र घेतलेली आहेत. याची सखोल चौकशी झाली पाहिजे!
(७) आजरा तालुक्यात वर्ग-२ च्या जमिनींचे बिगरशेती (N.A.) झाले आहे का? याची चौकशी व्हावी!

(८) बिगरशेती झालेल्या पोटहिस्साचे फेरफार व त्यासंदर्भातील ७/१२ फोरची चौकशी झाली पाहिजे
(१०) बिगरशेती (N.A.) प्रकरणांचे झालेले आदेश व त्यासंदर्भातील झालेला अंमल याची चौकशी व्हावी!
(११) कायदेशीर व बेकायदेशीररित्या झालेल्या बिगरशेती (N.A.) प्रकरणातील सर्व आदेश व त्या अंमलानुसार झालेल्या सर्व प्रक्रियांची सखोल चौकशी व्हावी!
(१२) बिगरशेती NA सर्व गट नंबर मधील फेरफार कसे घातले आहेत. या NA संदर्भातील आदेश (ऑर्डर) कशा झालेल्या आहेत. याची सखोल चौकशी झाली पाहिजे!
वरील मुद्दांच्या आधारे आजरा तालुक्यातील सर्व बिगरशेती NA प्रकरणांची सविस्तर, बनिचूक सखोल चौकशी करून सर्व संबंधितीच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये दप्तर दिरंगाई व हलगर्जीपणा वेळकाढूपणा होऊ नये. यांची दक्षता आपण घ्यावी. तसेच ताबडतोब बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील येथील रहिवाशी लोकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. असे दिलेल्या नियोजनात म्हटले आहे या निवेदनावर सुनिल हरेर, संजय कुंभार, अनिल चौगले, विनोद ओतारी, लखन पाटील, संगीता जादूनवर ,मंगल घोरपडे ,मोहन गावडा, भावेश्वरी कॉलनी, बुरूडे आजरा रहिवासी प्लॉटधार आणि प्रमोद पाटील, दिंगबर विटेकरी, संघर्ष प्रज्ञावंत, संजय कांबळे, मजीद मुल्ला, राहुल दास, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.
मडिलगेत श्री. सरस्वती वाचनालय आयोजित वाचन प्रेरणा दिवस संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेचा प्रचार प्रसारासाठी आणि वाचन संस्कृती वृद्धिन्गत होण्यासाठी माजी राष्ट्रपती स्व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयती निमित्य वाचनालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये वाचन प्रेरणा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष जनार्दन नेऊन्गरे यांनी मान्यवर व सर्व उपस्थितांचे स्वागत कैले त्यानी आपल्या प्रास्ताविकात वाचनालयाविषयी थोडक्यात माहिती सांगितली आमचे वाचनालय इतर “अ” वर्गामध्ये असून आजरा तालुक्यात एकमेव वाचनालय आहे आज वाचनालयात मुलांची स्पर्धा परिक्षा बाल विभाग शेतकन्यांच्या विषयी आरोग्य पाककला थोरा मोठ्यांची चरित्रे नाटके खेळ शैक्षणिक धार्मिक एतिहासिक संदर्भ इग्रजी हिंदी कादबरी कथा काव्य अशी सर्व प्रकारची मिळून २५००० च्या आसपास ग्रंथ संपदा असून विध्याथ्र्यांनी व ग्रामस्थानी याचा लाभ घेऊन आपल्या जीवनात आनंद घ्यावा जास्तीत जास्त जो पुस्तके वाचेल तोच या जगात टिकणार आहे त्यानी वाचन प्रेरणा दिनानिमित्य आवाहन केले कि जो जास्त पुस्तके वाचेल त्या पटीत वाचानालायातर्फे रोख रक्कमेचें बक्षिस देण्यात येईल तसेच वाचनालयात दैनिके १९ साप्ताहिके १२ पाक्षिके ०५ मासिके ६५ असे विविध प्रकारचे वाचनीय साहित्य वाचनालयात नियमितपणे येतात याचा बरेच वाचक लाभ घेत आहेत स्पर्धा परिक्षाची पुस्तके वाचनाचा अनेक विदयार्थी लाभ घेत आहेत. वाचनालयामध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी वकृत्व व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये १ ली ते ४ थी गट वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमाक जान्हवी सदीप निउन्गरे दद्वितीय क्रमांक आराध्या दयानंद गुरव तृतीय क्रमांक श्रावणी विनोद उगाडे ५ वी ते ७ वी गट वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक संजाल अरुण येसरी दवितीय क्रमाक स्नेहल प्रकाश हरळकर तृतीय क्रमांक संस्कृती रवींद्र गुरव सलोनी सागर सुतार ८ वी ते १० वी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक संकेत धोंडीबा काबळे दद्वितीय क्रमांक श्रावणी सागर कदम तृतीय क्रमांक अथर्व विजय कुरळे उत्तेजनार्थ ऋतुजा अरविंद सातुसे ८ वी ते १० वी निबंधलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिकेत अरुण सुतार
द्वितीय क्रमांक विपुल बाळाराम इंगळे तृतीय क्रमांक संकल्प दत्तात्रय येसणे उत्तेजनार्थ मधुरा दयानंद सुतार सदर विध्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते वही पेन देऊन करण्यात आला
यानंतर वाचनालयाचे उपाध्यक्ष विजय परुळेकर संचालिका सुवर्णा पोवार यांनी आपल्या
शैलीत मुलाना व वाचकांना पुस्तक वाचनाने आपल्या जीवनात मिळणारे यश येणाऱ्या संकटाना मात करून कसे मिळवता येते हे त्यांनी विविध उदारणे देऊन पटवून दिले त्यांनी पुस्तक जो वाचेल तोच जीवनात यशस्वी होईल ज्यांनी ज्यांनी पुस्तके वाचली ती माणसे आज आपल्या अडचणीना सामोरे जाऊन कशी मोठी झालेत याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली
सदर कार्यक्रमास मडिलगे हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ श्री शंकरलिंग विध्यामन्दीरचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ हायस्कूलचे व मराठी शाळेचे सर्व विध्यार्थी वाचनालयाचे कार्यवाह महादेव पाटील खजिनदार राजेंद्र कुंभार, सदस्य रघुनाथ येसणे, आनंदा कडगावकर, दत्तात्रय देसाई, जनार्दन पाटील, गणपती आयवाळे वाचकवर्ग कर्मचारी मारुती मोहिते, सुदर्शन चोडणकर, जोतिबा निउन्गरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे संचालक विजय परुळेकर यांनी केले. तर ग्रंथपाल सुर्यकांत चोडणकर यांनी सर्वांचे आभार मानले
