Homeकोंकण - ठाणेबनावट सोने तारण ठेवून २१ लाख १७ हजार ३८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी...

बनावट सोने तारण ठेवून २१ लाख १७ हजार ३८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आजरा पोलीस ठाणे गुन्हा नोंद.🛑दुर्गामाता सार्वजनिक तरुण मंडळ मडिलगे आयोजित.- मोफत आरोग्य तपासणी उपक्रम संपन्न.🛑४०० रु मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. राजेद्र गड्याणवार ( आजरा साखरवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पद्ययात्रेने मोर्चा..)

🛑बनावट सोने तारण ठेवून २१ लाख १७ हजार ३८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आजरा पोलीस ठाणे गुन्हा नोंद.
🛑दुर्गामाता सार्वजनिक तरुण मंडळ मडिलगे आयोजित.- मोफत आरोग्य तपासणी उपक्रम संपन्न.
🛑४०० रु मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. राजेद्र गड्याणवार ( आजरा साखरवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पद्ययात्रेने मोर्चा..)

आजरा. प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आहे. मागील वर्षी घातलेल्या उसाला ४०० रुपये मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पदयात्रा काढून जणजागृती करत आहे. त्याला साथ द्यावी असे आवाहन संघटनेचे नेते राजेंद्र गड्याणवार यांनी केले
आता ४०० रुपये घेण्याची चांगली संधी शेतकऱ्यांना आली आहे. हक्काने मागा, संघटनेला साथ द्या. ४०० रु दिले नाही तर हिसकावून घेवू. गडगंज झालेल्या संचालकांनी कधीच शेतकऱ्यांच्या जगण्याचा हिशेब मांडला नाही केवळ कारखान्यावरील कर्जाचा बोजा दाखवून भावनिक खेळ करत आहेत. कारखाना अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांनी व्यवस्थापन व संचालकांना साथ दिली आहे.आता साखरेसह उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे संचालकांनी शेतकऱ्यांना ४०० रुपये द्यावेच लागतील. न दिल्यास त्यांना जाब विचारावा लागेल. कारखान्याची निवडणूक लागली आहे. मतदान मागण्यासाठी येतील. त्यानां गावाच्या वेशीवरच आडवावे लागेल. घात आले शेतकऱ्यांनो संधी सोडू नका. असे आवाहन स्वाभिमानी संघटनेचे श्री. गड्याण्णावर, ता. अध्यक्ष तानाजी देसाई यांनी केले.
यावेळी संजय देसाई कृष्णा पाटील, निवृत्ती कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली. ( आंदोलकांच्या मागणीला उत्तर देताना चेअरमन सुनील शिंत्रे म्हणाले आपली मागणी रास्त आहे आम्ही सहमत अहोत.परंतु याबाबतीत सर्व संचालक मंडळाशी चर्चा करून निर्णय कळवतो. असे आंदोलकांना श्री शिंत्रे यांनी सांगितले )
यावेळी शेतकरी संघटनेचे आजरा तालुक्याचे नेते व कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक विष्णुपंत केसरकर, सभासद शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कृष्णा पाटील, सखाराम केसरकर, सुरेश पाटील, निवृत्ती कांबळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

🛑बनावट सोने तारण ठेवून २१ लाख १७ हजार ३८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आजरा पोलीस ठाणे गुन्हा नोंद.

आजरा.- प्रतिनिधी.

मुत्थुट फिनकॉर्प या सोने तारण देऊन कर्ज प्रकरणे करणाऱ्या कंपनीमध्ये बनावट सोने तारण ठेवून २१ लाख १७ हजार ३८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आजरा पोलीस ठाणे येथे विशाल वसंतराव देसाई राहणार नेवरेकर कॉलनी आजरा व ऋतेश सुरेश माजीक रा. प्लॉट नंबर 7, एलोरा गार्डन सम्राट नगर, कोल्हापूर या दोघाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत आजरा पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, अशी की देसाई व माजिक यांनी मुथूट फायनान्श्या आजरा शाखेतून १९ जुलै २०२२ रोजी बनावट सोने ठेवून कर्ज प्रकरणाद्वारे लाखोंच्या घरात रक्कम उचलली. सदर रकमेची परतफेड न केल्याने सोने तपासणी केली असता सदर सोने बनावट असल्याचे आढळले. ही फसवणूक २१ लाख १७ हजार ३८० रुपयांची आहे. यापैकी माजित याच्यावर फसवणूक प्रकरणी यापूर्वी सावंतवाडी येथे गुन्हा नोंद आहे.
याप्रकरणी मुथ्ठूत फिनकॉर्प फायनान्सचे आजरा शाखा व्यवस्थापक दिनकर रामचंद्र वडर रा. कानडेवाडी, तालुका गडहिंग्लज यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिल्याने संबंधितांवर गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. डी. ढेरे पुढील तपास करीत आहेत.

🛑श्री दुर्गामाता सार्वजनिक तरुण मंडळ मडिलगे आयोजित.- मोफत आरोग्य तपासणी उपक्रम संपन्न।

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा मडिलगे येथे बुधवार दि.१८-१०-२०२३ रोजी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मडिलगे आणि श्री दुर्गामाता सार्वजनिक तरुण मंडळ मडिलगे व मडिलगे ग्रामस्थ यांचे संयुक्त विद्यमाने आयुष्मान भवः अभियान अंतर्गत वय वर्षे१८ वर्षांवरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मोफत गोळ्या-औषधे देण्यात आली,तसेच त्यांचे ABHA कार्ड आणि Golden कार्ड काढण्यात आले. या शिबिराचा १०० नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमामध्ये आरोग्य विभाग मडीलगे आणि दुर्गामाता तरुण मंडळ मडीलगे यांनी मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.