HomeUncategorizedसंकेश्वर - बांदा महामार्ग बाधित 🛑शेतकरी संघटना आजरा- गडहिंग्लज विभाग - बेमुदत...

संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित 🛑शेतकरी संघटना आजरा- गडहिंग्लज विभाग – बेमुदत धरणे आंदोलन दि.१२ पासून. 🛑दाभिल येथे सोमवार १६ रोजी खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन.

संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित 🛑शेतकरी संघटना आजरा- गडहिंग्लज विभाग – बेमुदत धरणे आंदोलन दि.१२ पासून. 🛑
दाभिल येथे सोमवार १६ रोजी खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन.

आजरा. – प्रतिनिधी.

संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटना आजरा- गडहिंग्लज विभाग – बेमुदत धरणे आंदोलन दि.१२ पासून आंदोलन करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि गेली अनेक महिने संघटनेच्या माध्यमातून संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासंदर्भात अनेक वेळा बैठका, आंदोलने शांततेच्या मार्गाने करत आहोत. मात्र महामार्ग बाधित शेतकऱ्यांची फसवणूक करून महामार्गाचे काम सरकारी यंत्रणा व कंपनी पुढे रेटण्याचे काम करत आहे. रस्ता रुंदीकरण करताना साडेपाच मीटरवर वहिवाट होती अठरा वर्षांपूर्वी माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीमध्ये आहे. सरकारी यंत्रणा ज्या जी. आर चा आधार घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे त्याला पुरावा म्हणून अनेक वेळा माहिती अधिकारातील मिळालेली माहिती सादर केली आहे. असे असताना महामार्ग बनवला जात आहे. सध्या वळण काढून महामार्ग सरळ केला जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतातून जाण्यासाठी जाहीर नोटीस स्थानिक दैनिकांना न देता काही दैनिकांना दिली. वास्तविक प्रत्येक खातेदाराला स्वतंत्र नोटीस दिली पाहिजे दिलेल्या जाहीर नोटिशीला आमचे संघटनेमार्फत म्हणणे देत आहोत. सदर जाहीर म्हणणे असे की सर्व शेतकऱ्यांना चालू बाजारभावाप्रमाणे किंवा रेडीरेकरच्या पाच पट दराने जी जास्त रक्कम होईल ती मिळाल्याशिवाय कोणत्याही शेतात कोणतेही महामार्गाचे काम करू नये तसेच स्वतंत्र खातेदारांचे स्वतंत्र म्हणणे देण्यासाठी व सर्व शेतकऱ्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी दि.१२ रोजी गुरुवारी तहसील कार्यालय आजरा यांचे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत याची संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटना आजरा – गडहिंग्लज. यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती माहितीसाठी १)कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक दोन कोल्हापूर २)जिल्हाधिकारी, कोल्हापूर. ३)पोलीस निरीक्षक,आजरा ४)उपअभियंता बांधकाम विभाग आजरा. यांना देण्यात आले आहे. काँ. शिवाजी गुरव सह यावेळी बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दाभिल येथे सोमवार १६ रोजी खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन

दाभिल येथे नवरात्रौत्सवानिमित्त सोमवार दि. १६ रोजी खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशंभो सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ व नवरात्रौत्सव उत्सव कमिटीच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे. १६ रोजी रात्री ८ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेसाठी ३५१ रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५५५५, ४४४४, ३३३३ व ११११ असे रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट हार्मोनियम वादक व गायक यांना ५०१ रूपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ह. भ. प तानाजी हासबे, विजय राणे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.