🛑आजरा सोहाळे येथे वन विभाग कडून वन्यजीव सप्ताह साजरा. ( वनांचे संरक्षण करा संवर्धन करा जतन करा .- स्मिता डाके परिक्षेत्र वनअधिकारी आजरा.) 🛑आजऱ्यातील रामतीर्थ व्यापारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना भेटवस्तूचे वाटप.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा सोहाळे येथे वन विभाग कडून वन्यजीव सप्ताह साजरा.
दि.१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो व वन्यप्राणी व वनसंपदेचे महत्त्व त्यानिमित्ताने पटवून देऊन त्यांविषयी जनजागृती केली जाते त्या आणुषंघाने परिक्षेत्र वनअधिकारी आजरा स्मिता डाके यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ- उत्तर आजरा यांचेमार्फत दि. ७ रोजी ऑक्टोबर रोजी मौजे सोहाळे ता.आजरा येथील अनंत विद्यामंदिर सोहाळे येथे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.यावेळी अनंत विद्या मंदिर सोहाळे शाळेचे शिक्षक यांनी वनअधिकारी व कर्मचारी यांचे स्वागत केले व प्रास्ताविक मांडले. यानंतर वनरक्षक अस्मिता घोरपडे यांनी वन्यजीव विषयी महत्व पटवून दिले जंगलात आग लावल्याने काय दुष्परिणाम होतात याबद्दल माहिती सांगितली तसेच वनांचे संरक्षण करा संवर्धन करा जतन करा असा संदेश दिला वन्यजीव सप्ताह हा वनांचे महत्व तसेच वन्यप्राणी विषयी माहिती देऊन जनजागृती करणे हा या कार्यक्रमा पाठीमागचा उद्देश आहे असे सांगितले.यावेळी विद्यामंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमासाठी परिमंडळ वनअधिकारी उत्तर आजरा श्री.बाळेश न्हावी,वनरक्षक दयानंद शिंदे,वनमजुर सुरेश पताडे मारुती शिंदे व प्रविण कांबळे तसेच विद्यार्थी,अंगणवाडी सेविका,ग्रामस्थ उपस्थित होते.
आजऱ्यातील रामतीर्थ व्यापारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना भेटवस्तूचे वाटप.
आजरा : प्रतिनिधी.

आजरा शहरातील रामतीर्थ व्यापारी बंधू ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्यावतीने संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संजय पाचवडेकर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात १० सभासदांना ब्लँकेट भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. स्वागत मॅनेंजर अशोक तांबेकर यांनी केले. भेटवस्तू वाटपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलताना अध्यक्ष पाचवडेकर म्हणाले, २५ वर्षाच्या कालावधीत भागधारक, ग्राहक, ठेवीदार यांच्या हिताची जपणूक होईल अशा दृष्टीने संस्थेचे धोरण आखून संस्थेचा कारभार केला आहे. अहवाल सालात संस्थेकडे ४ कोटींवर ठेवी असून २ कोटींवर कर्जे वाटप केली आहेत. संस्थेला १० लाखांवर नफा झाला असल्याचे स्पष्ट करत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. व रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तूचे वाटप करत असून सभासदांनी त्याचा लाभा घ्यावा असेही आवाहन केले. यावेळी सर्व संचालकांसह जयदीप देसाई, रवी देसाई, मारुती मनगुतकर, रामचंद्र निकम यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. आभार ज्येष्ठ संचालक जोतीबा चाळके यांनी मानले.
