इचलकरंजी दि. ७ प्रतिनिधी.
इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय कृति समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. हे लाक्षणिक उपोषण महात्मा गांधीजींच्या पुतळ्यानजीक सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येईल. कृति समितीचे सर्व प्रमुख या उपोषणात सहभागी होतील. इचलकरंजीच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी व्हावे. तसेच हजारोंच्या संख्येने भेट द्यावी व पाठिंबा द्यावा” असे जाहीर आवाहन कृति समितीच्या वतीने जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजना कार्यान्वित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर पुढे आजअखेर ही बैठक होऊ शकली नाही. गणेशोत्सवानंतर कृति समितीच्या वतीने पुढील आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे कृति समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या समन्वय समितीच्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना कार्यालय, महासत्ता चौक, येथे आज झालेल्या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये अजीतमामा जाधव, शशांक बावचकर, मदन कारंडे, रविंद्र माने, विठ्ठल चोपडे, कॉ. सदा मलाबादे, कॉ. सुनील बारवाडे, रीटा रॉड्रिग्युस, कौशिक मराठे, भाऊसाहेब आवळे, अभिजित पटवा, विकास चौगुले, प्रताप पाटील, राहुल सातपुते, जाविद मोमीन, विजय जगताप, वसंत कोरवी इ. मान्यवर उपस्थित होते.
आजरा /देवर्डे शाळेत वन्यजीव सप्ताह संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

देवर्डे ता. आजरा येथील विद्यामंदिर श्री रवळनाथ हायस्कूल देवर्डे त वर्ड फॉर नेचर या संस्थेकडून सर्प जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली प्रास्ताविक उत्तम कोकीतकर यांनी केले शुभम पांडे संस्थापक अभिजीत वाघमोडे राज्याध्यक्ष श्रेयस पट्टणशेट्टी अनुप शेलार यांनी विद्यार्थ्यांना सापाच्या विविध जातींची ओळख विषारी साप बिनविषारी साप सापा विषयीचे गैरसमज सर्पदंश झाला तर प्राथमिक उपचार याविषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी मुख्याध्यापक नामदेव माईनकर सुभाष सावंत महादेव तेजम सुनील पाटील सरोजिनी कुंभार रेश्मा बोलके चंद्रकांत घुरे महेश नावलगी राजेंद्र पाटील या शिक्षकांसह विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी तर आभार देवेंद्र शिखरे यांनी मानले.
