HomeUncategorizedसभासदांचा आर्थिक सहभाग वाढवा यासाठी विविध योजना आणि सेवा.- डॉ. अनिल देशपांडे.(...

सभासदांचा आर्थिक सहभाग वाढवा यासाठी विविध योजना आणि सेवा.- डॉ. अनिल देशपांडे.( आजरा अर्बनची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.)🛑 आजरा अण्णा – भाऊ सूतगिरणी ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. 🛑 आजरा शेतकरी संघाची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

🛑 सभासदांचा आर्थिक सहभाग वाढवा यासाठी विविध योजना आणि सेवा.- डॉ. अनिल देशपांडे.
( आजरा अर्बनची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.)🛑 आजरा अण्णा – भाऊ सूतगिरणी ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. 🛑 आजरा शेतकरी संघाची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. स्वागत व प्रास्ताविक मनोगत चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी केले. अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी होते. उपस्थित सभासदाना बँकेच्या ६३ व्या वार्षिक सभेला संबोधित करताना चेअरमन श्री. डॉ. देशपांडे म्हणाले
कोविड काळात आपण सर्वजण स्थिर स्थावर होतो. तोपर्यंत अनेक वेगवेगळी संकटे देशावर आली त्यामुळे महागाई इंधन दरवाढ व या महागाईवर नियंत्रण ठेवण्याकरिता रिझर्व बँकेने रेपो रेट २५० बेसिक पॉईंट ने वाढवला रेपो रेट वाढवणे बँकांनी ठेविदावरील व्याजदर वाढवले परिणामी बँकांच्या ठेवीवर त्यांचा परिणाम झाला यामुळे याच धरतीवर बँकेने विकासामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने आणि सर्वांचा आर्थिक सहभाग वाढावा यासाठी विविध योजना आणि सेवा या आधारावर मांडल्या आहेत. पुढील काळात देखील आपले सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्यासाठी प्रयत्नशील राहतील अहवाल वर्षात बँकेने ग्राहकांना जलद गती सुविधा मिळावी याकरिता डेबिट कार्ड देण्याची सुविधा केली आहे. एटीएम कार्डसह पिन त्वरित मिळण्यासाठी ग्रीन पिन सुविधा चालू केली आहे. अशा अनेक योजना चालू केले आहेत सध्या नवीन कार्यप्रणालीप्रमाणे आजरा अर्बन बँकेचे गुगल पे, फोन पे, पेटीएम मोबाईल बँकिंग ई सुविधा माध्यमातून देखील आपली बँक कार्यान्वित झालेली आहे. बँकेकडून अल्प दरात कर्ज सुविधा उपलब्ध आहेत यासाठी सर्व ग्राहकांनी नजीकच्या शाखेची संपर्क साधून लाभ घ्यावा तसेच राष्ट्रीय सहकार संघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सभासदांना प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्याची सभासदानी लाभ घेऊन बँकिंग व्यवहारांमध्ये उपयोग करून घ्यावा. कर्ज वाढवण्यासाठी बँकेने कर्जावरील रिबेट योजना सुरू केली असून ग्राहकाने आपली कर्जाची परतफेड करून रिबेट योजनेचा लाभ घ्यावा. व सर्व सभासदांनी बँकेच्या प्रगतीसाठी हातभार लावावा असे शेवटी बोलताना श्री देशपांडे म्हणाले
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत सभा नोटीस विषय पत्रिका वाचन केले. सद्याचा काळही आव्हानात्मक आहे. रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाइंडियाने बदलेल्या सूचनेचा पालन करत कर्जदार व सभासदांना लाभ घेण्यासाठी कारागीर, घरबांधणी, लहान खरेदी आशा वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्यावा.असे श्री गंभीर म्हणाले.
यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक सराटी यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.
या सर्वसाधारण सभेत विविध गुणवंतांचे व नव्याने नियुक्ती झालेल्या सर्वांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले यावेळी आजरा अर्बन बँकेचे सर्व संचालक संचालिका सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तानाजी गोलकर यांनी केले. तर संचालक विलास नाईक यांनी आभार मानले.

🛑अण्णा – भाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

आजरा ता. येथील अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित आजरा ची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षांनी चेअरमन श्रीमती अन्नपूर्णा चराटी होत्या. स्वागत व प्रास्ताविक श्रीमंती चराटी यांनी केले. अण्णाभाऊ यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन संचालक मंडळाच्या उपस्थितीत झाले यावेळी श्रद्धांजली वाचन संचालक गिरी यांनी केले तर सभेचे नोटीस वाचन व मंजुरी दत्तात्रय दोरुगडे यांनी केले.
यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले देशात सद्यस्थितीला सूतगिरणीची अवस्था बिकट आहे सुताचे दर व महागाई वाढल्यामुळे वस्त्रोद्योग डबघाईला येत असताना भारतात १६५ सूतगिरण्या आहेत. तर महाराष्ट्रात मोठ्या सात सूतगिरण्या असून यापैकी राज्यात तीन सूतगिरण्या चालू आहेत. यामध्ये युक्रेन युद्धामुळे वास्तू उद्योगाची बिकट अवस्था झाली आहे सद्यस्थितीला काही प्रमाणात सूतगिरण बंद आहे. लवकरच चालू होणार आहे. कामगारांचे देखील काही किरकोळ प्रश्न आहेत. नाराजी आहे. ती दूर करून व त्यातून मार्ग काढून लवकर सूतगिरण चालू होईल. एनसी डीसी ला काही नव्याने प्रस्ताव पाठवले आहेत. लवकरच मंजुरी मिळेल तसेच सूतगिरणी परिसरात होणारा आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे. जागेला मंजुरी दिली आहे सीएनजी प्रोजेक्ट देखील लवकर चालू होणार आहे. असे बोलताना श्री चराटी म्हणाले. यावेळी नव्याने नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व संचालक संचालिका सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन सचिन सटाले यांनी केले तर आभार रजनीकांत नाईक संचालक यांनी मानले

🛑आजरा शेतकरी संघाची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

आजरा येथील आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड आजरा ची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी केडीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई होते. सभेच्या सुरुवातीस कै. अमृत काका देसाई व राजारामबापू देसाई यांचे फोटो पूजन व दीपप्रज्वलनाने सभेला सुरुवात झाली स्वागत व प्रस्ताविक चेअरमन विठ्ठलराव देसाई यांनी केले यावेळी चेअरमन श्री देसाई म्हणाले शासनाच्या काही धोरणामुळे खतपुरवठा झाला नाही व काही काळ खंडित राहिला भविष्यकाळात शेतकरी संघ हा शेतकऱ्यांचा संघ आहे सर्व सुविधा चांगल्या पद्धतीने मिळाव्या व सभासदांना सर्व योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्व संचालक मंडळ आपल्या सेवेसाठी तत्पर राहील सद्यस्थितीला ३५ लाख भागभांडवल व १ कोटी ४० लाख व्यापारी नफा असून शेतकरी संघ हा चांगल्या पद्धतीने चालू आहे. संघाचे व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी संघाच्या दैनंदिन कामकाजास लक्ष घालून संघाच्या प्रगतीस हातभार लावला असल्याचे चेअरमन देसाई बोलताना म्हणाले यावेळी बँकेचे मॅनेजर जनार्दन बामणे यांनी अहवाल वाचन करून सगळे पुढे विषय मांडले व सर्व विषयांना एकमताने सभासदाने मंजुरी दिली.
यावेळी सालाबाद प्रमाणे गुणवत्ताचा सत्कार यामध्ये शैक्षणिक व अन्नक्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या गुणवत्ता चा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या सर्वसाधारण सभेत सभासद तानाजी देसाई, सचिन पावले इंद्रजीत देसाई श्री पवार श्री मुळीक यांनी सभासदांच्या हिताचे प्रश्न उपस्थित केले…

या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व संचालक संचालिका सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुखवटा ठराव उदय पवार यांनी मांडला तर सूत्रसंचालन गिलबिले सर यांनी केले. आभार गणपती सांगले यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.