अंदमानात दाखल:- उन्हाळा विसरा,- पावसाळा वेळेआधीच सुरु होणार
मुंबई, प्रतिनिधी. २१ मे :-
तौक्ते चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण मागील दोन दिवस ३-४ राज्यांमध्ये प्रचंड नुकसान केल्याचं पाहायला मिळालं. एकाबाजूला वादळ काही तास किंवा दिवसभर घोंघावुन संपेल आणि पुन्हा कडक उन्हाळा अंगावर झेलावे लागेल असे अंदाज बांधले गेले. मात्र जून ६ ते १२ जूनपर्यंत अंदमानमध्ये हजर होणारा मान्सून सर्वांचे अंदाज चुकवून २-३ दिवसात तेथे दाखल होणार असल्याचा निष्कर्ष हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. अंदमान-निकोबार बेटावर मान्सूनच्या सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान विभागाने सांगितलं होतं. त्यानुसार मान्सूनने अंदमान निकोबार बेटावर एण्ट्री केली.तर मोसमी पाऊस आज अंदमानात पोहचला.
हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करुन मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली. मोसमी पाऊस आज अंदमानात पोहोचला, असं ट्विट होसाळीकर यांनी केलं. नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतीय उपखंडात मान्सून म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं हे वारे 1 जूनला केरळमधील दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला.