Homeकोंकण - ठाणेमागील २४ तासात ४४ हजार ४९३ जण कोरोनामुक्त; ५५५ रूग्णांचा मृत्यू.

मागील २४ तासात ४४ हजार ४९३ जण कोरोनामुक्त; ५५५ रूग्णांचा मृत्यू.

मागील २४ तासात ४४ हजार ४९३ जण कोरोनामुक्त; ५५५ रूग्णांचा मृत्यू

मुंबई – प्रतिनिधी. २१

राज्यात आजपर्यंत एकूण ५०,७०,८०१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८६ हजार ६१८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२४,४१,७७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,२७,०९२ (१७.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,९४,४५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,९४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६७,१२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. याआधी राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता, त्यानंतर १ जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य सरकारने निर्बंधदेखील कठोर केले आहेत. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचं संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.