HomeUncategorizedआजरा शेतकरी सह. साखर कारखान्याला कै. वसंतराव देसाई नाव द्यावे.- स्वाभिमानी शेतकरी...

आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याला कै. वसंतराव देसाई नाव द्यावे.- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.

आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याला कै. वसंतराव देसाई नाव द्यावे.- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा सहकारी साखर कारखान्याला कै. वसंतराव देसाई सहकारी साखर कारखाना असे नाव द्यावे याबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजरा कारखान्याला दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा सहकारी साखर कारखान्याची स्थापना कै. वसंतराव देसाई यांनी अत्यंत अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये केली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, कामगार, वाहतूकदार व इतर घटकांच्या विकास होण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळे त्यांची निरंतर आठवण राहावी म्हणून साखर कारखान्याला “वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखाना लि. गवसे” असे नाव द्यावे व त्याबाबत प्रस्ताव येणाऱ्या जनरल सभेपुढे ठेवावा याबाबतची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आजरा तालुका यांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कारखाना व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. या निवेदनावर तानाजी देसाई, इंद्रजीत देसाई, सखाराम केसरकर, कृष्णा पाटील, सुरेश पाटील, भिकाजी पटेकर, निवृत्ती कांबळे यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.