प्रशांत गुरव यांची लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड. ( आजरा – व्यंकटराव हायस्कूल आजराचे विज्ञान व गणित विषयाचे सहाय्यक शिक्षक.)
आजरा.- प्रतिनिधी.
आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब संचलित लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयल यांच्यावतीने गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कागल, भुदरगड, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यातील आदर्श शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आजरा तालुक्यातून व्यंकटराव हायस्कूल आजराचे विज्ञान व गणित विषयाचे सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी मार्गदर्शक. एन.एम.एम.एस. परीक्षा तज्ञ मार्गदर्शक, विज्ञान प्रदर्शनामध्ये सातत्याने तालुका व जिल्हास्तरावरील यश, विविध प्रशिक्षणांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून यशस्वी सहभाग, विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन कुप्पम राज्य आंध्रप्रदेश येथे आयोजित प्रशिक्षणात आठ दिवस सहभाग. गणित दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमामध्ये कृतीयुक्त सहभाग असे अनेक उपक्रम त्यांनी जबाबदारीने पूर्ण केले आहेत. केंद्रशासन पुरस्कृत एन. एम. एम. एस.शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, विविध प्रज्ञाशोध परीक्षेत त्यांच्या कित्येक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
सन २००७/८ मध्ये सह्याद्री दूरचित्रवाहिनी व स्टार प्रवाह वाहिनीवरील’ हा खेळ शब्दांचा’ या कार्यक्रमांमध्ये यशस्वी सहभाग हे त्यांच्या शैक्षणिक कार्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय. इयत्ता दहावी आयसीटी विषय जिल्हा समन्वयक व कलचाचणी जिल्हा समन्वयक म्हणून येथे कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शाळा सिद्धि उपक्रमामध्ये राज्य निर्धारक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. कोरोना सर्वेक्षण, कोविड योद्धा, पूरग्रस्तांना मदत, एड्सग्रस्त मदत, निवारा बालगृह मदतनिधीतही त्यांनी भरीव काम केले आहे.
त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला व उपक्रमशीलता,क्रीडा या अष्टपैलू कार्याची नोंद घेऊन लायन्स क्लबच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. त्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष माननीय जयवंतरावजी शिंपी व सर्व संचालक मंडळ यांचे प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. माननीय प्राचार्य आर. जी. कुंभार सर, पर्यवेक्षिका मा. शेलार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
