भुदरगड-राधानगरी तालुक्यातील १७.४० कि.मी. रस्त्यांसाठी १६ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -२ अंतर्गत रस्त्यांना निधी मंजूर
गारगोटी प्रतिनिधी,
मुख्यमंत्री सडक योजना टप्पा-2 संशोधन व विकास योजनेअंतर्गत राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 17.40 किलोमिटर लांबीच्या रस्त्यांसाठी 16 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामांना लवकरच सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे.
या योजनेतून भुदरगड तालुक्यातील करडवाडी ते पारदेवाडी रस्ता 1.100 कि.मी. रस्ता 1 कोटी 2 लाख, सुक्याचीवाडी ते माणी रस्ता 2.00 कि.मी. 2 कोटी 3 लाख, मेन रोड ते नांगरगांव गाव रस्ता 1.350 कि.मी. 1 कोटी 54 लाख, दासेवाडी ते कोंडोशी रस्ता 3.120 कि.मी. 2 कोटी 91 लाख, करडवाडी ते शेळोली रस्ता 1.780 कि.मी. 1 कोटी 63 लाख, शेणगांव ते सोनारवाडी रस्ता 2.530 कि.मी., 2 कोटी 55 लाख आदी कामांचा सामवेश आहे.
राधानगरी तालुक्यातील तोरस्करवाडी गाव फाटा ते तोरस्करवाडी गाव रस्ता 1.400 कि.मी. 1 कोटी 12 लाख, मेनरोड ते हुंब्याचा धनगरवाडा रस्ता 1.275 कि.मी.1 कोटी 8 लाख, इजिमा 64 ते पाटपन्हाळा रस्ता 2.850 कि.मी., 2 कोटी 46 लाख आदी रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
आमदार आबिटकर म्हणाले, राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या विस्तारित मतदारसंघ असून वाड्या वस्त्यांनी विखुरलेला असल्यामुळे रस्त्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मतदार संघातील सर्व रस्ते डांबरीकरण व्हावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 17.40 किलोमीटर रस्त्यासाठी 16 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे सहकार्य लाभले आहे.
