आजरा बस स्थानकावरील हिरकणी कक्षाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न..
आजरा. – प्रतिनिधी.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत आजरा बस स्थानकामध्ये आपल्या लहान बाळांना घेऊन प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांना आपल्या चिमुकल्यांना स्तनपान करण्यासाठी आणि थोडासा विसावा घेण्यासाठी एक हक्काची जागा म्हणजे एक छानसं हिरकणी कक्ष आजरा तालुक्यामध्ये अग्रगण्य असणारी सेवाभावी संस्था संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या कल्पनेतून स्थापन करण्यात आलं आहे. त्यामध्ये मातांना स्तनपानाचे महत्त्व त्याचबरोबर महिलांच्या आरोग्यासंबंधी विविध माहिती हे चित्राद्वारे प्रसारित केले आहे.. अशा या हिरकणी कक्षाचा लोकार्पण सोहळा दि. ३१ ऑगस्ट रोजी संवेदना फाऊंडेशनच्या महिला सदस्या सौ.गीता पोतदार,सौ.रेश्मा देशमुख,सौ.माधुरी पाचवडेकर,आसावरी मुणनकर,भैरवी सावंत या संवेदना महिला शक्तींच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले….
हिरकणी कक्षाची कल्पकता ज्यांनी चित्रातून साकारली आहे असे चित्रकार संवेदना फाऊंडेशन सदस्य श्री. गणेश देसाई पेंटर (मडीलगे) यांचा संवेदना फाऊंडेशन मार्फत श्री.संजय हरेर,तानाजी पावले सर,डॉ. प्रविण निंबाळकर आणि आगार व्यवस्थापक श्री.घुगरे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला..
संवेदना फाउंडेशन आजरा यांनी आपल्या हाकेला चांगला प्रतिसाद देऊन एका अत्यंत सुंदर असे हिरकणी कक्षाची स्थापना केल्याबद्दल आजरा आगारामार्फत संवेदना फाऊंडेशनच्या उपस्थित सर्व सदस्यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला..
संवेदना फाऊंडेशन सेवाभावी संस्थेच्या कार्याचा आढावा संवेदना सदस्य श्री. देशमुख सर यांनी मांडला.या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास आजरा आगाराचे व्यवस्थापक श्री.राजेंद्र घुगरे, कार्यशाळा अधीक्षक श्री.पृथ्वीराज चव्हाण, आगार लेखागार श्री सुरेश पत्की, वरिष्ठ लिपिक श्री.वासुदेव जोशी, लिपिक श्री.संदीप खवरे,श्री. नामदेव गुडूळकर यांच्या सह संवेदना महिला सदस्य आणि स्थानिक सदस्य श्री.जीवन आजगेकर,श्रीतेज कवळेकर, फिलिप्स रॉड्रिक्स यांच्यासह प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते..संवेदना फाऊंडेशन आजराचे प्रशासकीय अधिकारी श्री.अमर पाटील यांनी आभार मानले..
