आजरा केंद्राची शिक्षण परिषद उर्दू विद्यामंदिर आजरा येथे उत्साहात संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा केंद्राची शिक्षण परिषद उर्दू विद्यामंदिर आजरा येथे उत्साहात दि.३१ रोजी संपन्न झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय सुनीत चंद्रमणीसो होते. प्रमुख उपस्थितीमध्ये आजरा केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक आनंदा कुंभार सर, मुळीक सर,मा .पांडूरंग आजगेकर सर एकनाथ आजगेकर सर बळिराम तानवडे सर ,प्रेमा साठे मॅडम, लक्ष्मण कविटकर सर होते.
कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवनाने झाली. त्यानंतर ‘सुनी जो उनकी आने कि आहट गरिबखाना सजाया हमने’हे सदाबहार व* *संगीतमय स्वागत गीत गाऊन शाळेच्या शिक्षकांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रस्तावना मुख्याध्यापक युनूस लाडजी सर यांनी केली. तर समिउल्ला नाईकवाडी सरानी शेरोशायरीच्या अनोख्या अंदाजात सूत्रसंचलन केले .तंत्र शिक्षक श्री.मोहम्मद तगारे यांनी शाळेची यशोगाथा पी.पी.टी च्या सहाय्याने दाखवली.यावेळी कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेले चंद्रयान -३, झेंडा स्तंभ, पुष्प,राख्या,वालपीस व ग्रेटिंग कार्डस इ.साहित्याची आकर्षक मांडणी करण्यात आली होती .त्याचे उदघाटन आदरणीय चंद्रमणी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. आर.बी.कुंभार सर व श्री.सुभाष नाईक सर यांनी नवोपक्रम,इंन्सपायर अवार्ड इत्यादी विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले.यावेळी मा श्री.मिलिंद चंद्रमणी यांची कृषी उपसंचालक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.यावेळी इ.दूसरीच्या विद्यार्थ्यानी सैनिकांच्या वर्दीत समुहनृत्य सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. कौसरबानो लाडजी,श्रीमती मासाहेबी मोमिन, वसिम पटेल सर,.युनूस नाईक सर ,सौ.आसमा मुल्ला व श्रीमती.मिनाज नदाफ यांनी परिश्रम घेतले.

