कोंव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी राज्य सरकारकडून आता SOP – जाहीर.. म्हणजे काय पहा.
मुंबई प्रतिनिधी.२१
राज्यात कोविड सेंटरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या अनेक घटना गेल्या वर्षभरापासून सुरु आहेत. महिलांवर सतत होणाऱ्या या अत्याचारांमुळे कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक SOP जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला हिरवा कंदीत देत राज्य सरकारने आज कोविड सेंटरसाठी SOP जाहीर केला आहे. या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. काय आहेत त्या मार्गदर्शक सूचना जाणून घ्या.
प्रत्येक कोविड सेंटरमध्ये कोरोना उपचारांसाठी महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड असणे आवश्यक आहे.
प्रत्येक महिला वॉर्डमध्ये महिला डॉक्टर आणि महिला कर्मचारी असणे अविवार्य असणार आहे. प्रत्येक कोविड सेंटरच्या प्रत्येक महिला वॉर्डमध्ये एक पॅनिक अलार्म बटण लावणे अविवार्य असणार आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये सीसीटीव्ह बसवण्यात यावेत, अशा मार्गदर्शक सूचना राज्यातील सर्व कोविड सेंटर्सना देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उचलले पावलामुळे महिलांना इथून पुढे कोविड सेंटरमध्ये घाबरुन बसण्याची गरज भासणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली मागणी मान्य केल्याने कोविड सेंटरमधील महिलांनाही दिलासा मिळणार आहे.