Homeकोंकण - ठाणे५० % नागरिक करतात मास्क लावता "हि" चूक.- आपण तर करत नाही...

५० % नागरिक करतात मास्क लावता “हि” चूक.- आपण तर करत नाही जाणून घ्या..

५० % नागरिक करतात मास्क लावता “हि” चूक.- आपण तर करत नाही जाणून घ्या..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था.

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनक लोक संक्रमित होत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच नागरिकांना मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे या त्रिसुत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र नागरिकांकडून याचे पालन होताना दिसत नाही. लोक मास्कचा वापर करतात परंतु तो योग्य प्रकारे करत नसल्याने कोरोना संक्रमित होण्याचा धोका अधिक आहे.

कोरोना विरोधात लढण्यासाठी महत्वाचे शस्त्र कोणते असेल तर ते आहे मास्क. पण 50 टक्के लोक याच शस्त्राचा योग्यपद्धतीने वापर करता दिसत नाहीत.

एका रिपोर्टनुसार 64 टक्के लोक चेहरा झाकतात पण नाकावर त्यांच्या मास्क नसतो. 20 टक्के लोकांचा मास्क हा हनुवटीवर असतो. तर 2 टक्के लोक मास्क मानेवर लावतात. केवळ 14 टक्के लोक असे आहेत ते नाक, तोंड आणि हनुवटी झाकली जाईल अशा योग्यप्रकारे मास्क लावतात. जर तुम्ही मास्क लावताना अशी चूक करत असाल तर लगेच सुधारा. योग्य पद्धतीने चेहऱ्यावर मास्क लावा.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क हाच पर्याय

नाक व तोंडावाटेच कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश करत असतो. त्यामुळे मास्कचा वापर केल्यास संसर्गापासून दूर राहता येणे शक्य आहे. त्यासाठी मास्क सर्जिकल अथवा N-95 असल्यास अधिक चांगले. कोरोनाचा नव्हे तर दमा, धुळीची अ‍ॅलर्जी यापासूनही बचाव होतो. हवेतून होणारा संसर्ग टाळता येतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.