HomeUncategorizedशरद पवार व अजित पवारांमध्ये झाली बैठक.- राष्ट्रवादीत चाललंय काय? चर्चांना उधाण.-...

शरद पवार व अजित पवारांमध्ये झाली बैठक.- राष्ट्रवादीत चाललंय काय? चर्चांना उधाण.- तर पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

शरद पवार व अजित पवारांमध्ये झाली बैठक.- राष्ट्रवादीत चाललंय काय? चर्चांना उधाण.- तर पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे – प्रतिनिधी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही बैठक झाली.शरद पवार आज पुण्यात होते. तसेच चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे.

शरद पवार – अजित पवार यांच्या भेटीची बातमी माध्यमांना कळाल्यानंतर उद्योगपतीच्या बंगल्याबाहेर पत्रकार जमा झाले. अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सुरुवातीला शरद पवार हे घराबाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवारांचा ताफा बंगल्यातून बाहेर पडला. मागील काही दिवसांपासून शरद पवार-अजित पवार दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात पवार काका-पुतणे यांच्यात ही भेट झाली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमावेळी अजित पवार-शरद पवार एकत्र आले होते. परंतु व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अजितदादांना साथ देत सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर काही दिवसांनी अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण सेंटर इथं जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. एकदा नव्हे तर दोनदा ही भेट झाली होती. शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, पक्षात कुठेही फूट पडू नये यासाठी भेट झाल्याचे त्यावेळी प्रफुल पटेल यांनी माध्यमांना सांगितले होते.मात्र भाजपासोबत मी जाणार नाही अशी ठाम भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. मात्र अजित पवार-शरद पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एकीकडे शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. त्यात येवला येथील सभेनंतर आता शरद पवार बीडमध्ये सभा घेणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवारांची ही स्वाभिमान सभा असल्याचे म्हटलं आहे.

अजित पवार खासगी गाडीने आले

पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 3 आहे. या परिसरात 73 नंबरच्या बंगल्यात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार निघून गेले आहेत. पण अजित पवार यांची गाडी बंगल्याच्या गेटच्या आतमध्ये आहे. गाडीसोबत वाहनचालकही आतमध्ये आहे. अजित पवार आज पुण्यातील चांदणी चौकच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते थेट सर्किट हाऊस येथे पोहोचले. त्यांचा ताफा सर्किट हाऊस याच ठिकाणी ठेवलेला आहे. पण ते एका खासगी गाडीने कोरेगाव पार्क परिसरात पोहोचले.

काही दिवसांपूर्वी अजित पवार हे स्वत: शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. त्यानंतर अजित पवार यांनी दोनवेळा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत काही नेत्यांनीदेखील शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवार यांनी आपल्यासोबत सत्तेत यावं, अशी विनंती अजित पवार यांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर आज पुण्यात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे कोरेगाव पार्कमध्ये राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.