Homeकोंकण - ठाणेडोळे संसंर्ग साथीचा उद्रेक!.राज्यात 1 लाख 87 हजार रुग्ण

डोळे संसंर्ग साथीचा उद्रेक!.राज्यात 1 लाख 87 हजार रुग्ण

डोळे संसंर्ग साथीचा उद्रेक!.
राज्यात 1 लाख 87 हजार रुग्ण

मुंबई :- प्रतिनिधी..

राज्याच्या अनेक जिल्ह्यात सध्या डोळ्यांचा संसर्ग होताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यातील कानोकोपऱ्यात विद्यार्थ्यांसह मोठ्यांनाही डोळे येण्याच्या साथीने ग्रासले आहे.तर राज्यात या संसर्गाचा उद्रेक होताना दिसत असून राज्यात आतापर्यंत 1 लाख 87 हजार रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

या उद्रेकात बुलढाणा पहिल्या क्रमांकावर असून येथे 30 हजार 592 रुग्ण रूग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुण्यात या आजाराने धुमाकूळ घातला आहे. या संसर्गामुळे जळगाव जिल्ह्यात 12 हजार, अमरावतीत 10 हजार आणि पुण्यात 10 हजारहून अधिक रूग्ण झाले आहेत. तर सध्या वातावरणामुळे या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.