HomeUncategorizedश्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचालित 'मृत्युंजय' कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंच...

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचालित ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंच आयोजित.( कै. पांडूरंग बिडकर गुरुजी यांचे स्मृतीप्रित्यर्थ खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.)

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचालित ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंच आयोजित.
( कै. पांडूरंग बिडकर गुरुजी यांचे स्मृतीप्रित्यर्थ खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.)

आजरा. – प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा (जि. कोल्हापूर) संचालित ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष के पांडुरंग विडकर (गुरुजी) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ खुल्या गटासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. बुधवार दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात स्पर्धा संपन्न होणार आहेत. पूर्वतयारी वक्तृत्वासाठी खालील विषय देण्यात आले होते ते पुढीलप्रमाणे.

१) कृत्रिम बुध्दिमत्तेचा उपयोग आणि भविष्यातील वाटचाल २) ट्रिपल इंजिन सरकार ३) मणिपूर हिंसाचाराचा अन्वयार्थ, ४) समान नागरी कायदा ५) शिवराज्याभिषेकाची ३५० वर्षे.
या स्पर्धेतील विजेत्यांना – प्रथम तीन क्रमांकांना अनुकमे रोख रूपये ५००१, ३००१, २५०१ व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याचबरोबर लक्षवेधी उत्स्फुर्त भाषणांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. पूर्वतयारी भाषणासाठी १० मिनिटे व उत्स्फुर्त भाषणासाठी ३ मिनिटे वेळ दिला जाईल. पूर्वतयारी व उत्स्फुर्त भाषणांच्या गुणांचा एकत्रीतपणे पारितोषिकासाठी विचार केला जाणार असून स्पर्धेसाठी प्रवेश फी घेतली जाणार नाही स्पर्धकांनी आपली नावे २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रत्यक्ष अथवा फोनव्दारे (फोन नं ०२३२३ – २४४४७४) नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर, उपाध्यक्षा गीता पोतदार कार्यवाह सदाशिव मोरे व विजय राजोपाध्ये यांनी केले आहे.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे शालेय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा (जि. कोल्हापूर) संचालित ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे आजरा तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. मंगळवार दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी स. १०.३० वा. वाचनालयाच्या सभागृहात स्पर्धा संपन्न होणार आहेत. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे.

लहान गट इयत्ता ५ वी ते ७ वी –

विषय – १) चांद्रयान मोहिम, २) मी नदी बोलतेय, ३) माझी वसुंधरा, ४) ‘मृत्युंजय’ कारांचे थोरपण, ५) शिवराज्याभिषेक सोहळा, मोठा गट – इयत्ता ८ वी ते १० वी – विषय- १) चंद्रावर स्वारी, २) महाराष्ट्राची संतपरंपरा ३) आजऱ्याची वाचन चळवळ ४) संगणकीय तंत्रज्ञान काळाची गरज ५) मानवाची प्रगती : निसर्गाची आपत्ती.

दोन्ही गटांसाठी विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुकमे ७०१, ६०१, ५०१ व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळेला प्रत्येक गटासाठी दोन स्पर्धक पाठविता येणार आहेत. स्पर्धकांनी आपली नावे २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत शाळेमार्फत नोंदवावीत असे आवाहन बाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक वाचूळकर उपाध्यक्षा गीता पोतदार कार्यवाह सदाशिव मोरे व विजय राजोपाध्ये यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.