HomeUncategorizedडॉ. देशपांडे सहकार, शिक्षण व सामाजिक विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व.- जिल्हा बँकेचे...

डॉ. देशपांडे सहकार, शिक्षण व सामाजिक विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व.- जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर ( डॉ. अनिल देशपांडे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.)

डॉ. देशपांडे सहकार, शिक्षण व सामाजिकसह विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व.- जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर ( डॉ. अनिल देशपांडे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.)

आजरा. प्रतिनिधी.

डॉ.अनिल देशपांडे हे विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. राजकीय परिस्थिती बदलत असताना डॉ. देशपांडे व अशोकअण्णा चराटी यांची धडपड निश्चितच योग्य आहे. बदलत्या राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही. म्हणूनच शक्य ती विकास कामे खेचून आणणे आम. प्रकाश आबिटकर यांचा प्रयत्न राहिला आहे. व कायम राहिल कोट्यावधी रुपयांचा निधी आजरा तालुक्याच्या विकासाकरीता मिळवून देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असून रामतीर्थ पर्यटन क्षेत्रासाठी पाच कोटींचा निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर डॉ. देशपांडे यांना शुभेच्छा देत असताना म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजरा अर्बन बँकेचे संचालक विलास नाईक यांनी केले. यावेळी त्यांनी डॉ. देशपांडे यांच्या वाटचालीचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते डॉ. अनिल देशपांडे यांचा सत्कार करून वाढदिवस करण्यात आला.
यावेळी बोलताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख नियोजन मंडळाचे सदस्य अशोक अण्णा चराटी म्हणाले, डॉ. देशपांडे यांची तालुक्याच्या विकास कामांसह राजकीय सामाजिक कार्यात निश्चितच सहकार्य राहिले आहे. यापुढेही त्यांनी विकास कामांमध्ये आपले योगदान नेहमीच ठेवतील अपेक्षित आहे.
अध्यक्षीय मनोगतात माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील म्हणाले, आपल्या आमदारकीपासून ते मंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात अण्णाभाऊंचे योगदान मोठे राहिले आहे. त्यांच्यामुळेच तालुक्यासाठी काहीतरी करण्याची संधी आपणाला मिळाली. अण्णा भाऊंची उणिव त्यांच्या वारसांनी निश्चितच भरून काढली आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. देशपांडे म्हणाले, काशिनाथ अण्णा व भाऊंचा वारसा सक्षमपणे पुढे नेत संस्था समूहातील संस्था प्रगतीपथावर आणल्या आहेत. यापुढेही संस्था अशाच भरभराटीला आणण्याचा आपला प्रयत्न राहील. पत्नी डॉ. अंजनी देशपांडे यांचेही आपल्या एकंदर वाटचालीत मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी विलास नाईक डॉ. प्रवीण निंबाळकर, सुरेश देशपांडे, आजरा अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक प्रशांत गंभीर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी रमेश कुरुणकर, आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर, माजी पंचायत समिती.सभापती मसणू सुतार कारखाना उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, आजरा सुत गिरणीच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णादेवी चराटी, विजयकुमार पाटील, दशरथ अमृते, नामदेवराव नार्वेकर, सौ. मनिषा कुरूणकर, मुकुंद तावडे, दिगंबर देसाई, शिवाजी इंजल, जयसिंग देसाई, विजय बांदेकर, जी. एम. पाटील, किरण कांबळे, दत्तात्रय मोहिते, मारुती मोरे, शंकर टोपले, डॉ. दीपक सातोसकर, नगरसेविका सूमैया खेडेकर, यासिराबी लमतुरे, सौ. अस्मिता जाधव, अनिकेत चराटी, सुरेश डांग, सौ. मिनल होळणकर, सौ. सौम्या तिरोडकर, डॉ. अशोक फर्नांडीस, प्रकाश देसाई यांच्यासह अण्णाभाऊ संस्था समूहातील सर्व सदस्य व डॉ. देशपांडे यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. आनंद बल्लाळ यांनी केले. आभार डॉ. सातोसकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.