हिरकणी आरामदायी बस या नावावर अधिक तिकीट दराने प्रवाशांची लूट. – साध्या दरात प्रवाशांना सेवा द्यावी.- आजरा तालुक्यातील नागरिकांची मागणी. – अन्यथा शालेय विद्यार्थी प्रवासी करणार आंदोलन.
आजरा. – प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आगाराला नव्या पाच हिरकणी बस देण्यात आल्या गेल्या अनेक वर्षापासून आजरा वासियांची मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. या नव्या बसच्या माध्यमातून आजरा तालुक्यातील नागरिकांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळाली आहे. पण सोबत आरामदायी बस या नावावर प्रवाशांची अधिक तिकीट दराने लूट होत आहे. याबाबत प्रवाशाकडून लवकरच आंदोलन छेडले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्यात आणखी काही बस आजरा आगाराला देण्यात येतील पण ग्रामीण भागातील जनतेला आरामदायी बस या नावावर कोल्हापूर पर्यंत पंचवीस रुपये अधिक दर आकारू प्रवाशांची लूट होत आहे. या बसेस प्रमाणे सावंतवाडी आगाराच्या व इतर गाड्या साध्या दरात जात असताना या आरामदायी बस देऊन प्रवाशांची लूट कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आजरा बसस्थानक व आजरा आगार आगामी काळात एक महत्त्वपूर्ण ज्यादा दर लावून प्रवाशांचे लूट करणारे आगार ठरणार असल्याचे प्रवासी वर्गाचे मत आहे. येथून सध्या मुंबई, पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापूर, गडहिंग्लज तालुक्यातील स्थानिक बस फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. पुढील काळात जितक्या हिरकणी आरामदायी बसेस उपलब्ध होतील तितका ग्रामीण भागातील स्थानिक फेऱ्यांचे तिकीट दरही जादा आकारले जातील यात काही शंका नाही. म्हणजे जुनं ते सोनं असं म्हणून पहिल्याच बस चांगल्या त्याच बसने प्रवास द्यावा. असे म्हणण्याची वेळ येणार आहे. ज्यादा दर आकारणी बाबत आजरा आगाराचे प्रमुख यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर सेमी लक्झरी आरामदायी बस असल्यामुळे अधिक दर आहे. परंतु प्रवासी यांचे मत आहे या पेक्षाही चांगल्या एसटी बस या सावंतवाडी डेपोच्या असताना देखील साध्या तिकीट दरात गाड्या असतात मग या गाडीला कोल्हापूर पर्यंतचा प्रवास २५ रुपये अधिक देऊन कशासाठी जरी आजरावासियांची मागणी पूर्ण झाली आहेच पण आजरा आगाराकडे केवळ ३५ बस उपलब्ध होत्या. त्यामुळे स्थानिक फेन्या आणि लांब पल्ल्याच्या फेन्या सोडताना अडचणी निर्माण होत होत्या. हे जरी खरं असलं तरी नव्या पाच बस उपलब्ध झाल्यामुळे लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांची अडचण दूर होण्यास मदत होईल पण यातून प्रवाशांची लूट होत आहे यासाठी सदर हिरकणी गाड्यांचे दर साध्या दरात नियमित ठेवावे अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे अन्यथा लवकरच आंदोलनाचा पवित्रा प्रवासी घेणार असल्याचे समजते.
