Homeकोंकण - ठाणेमनसे पदाधिकाऱ्यांची आरटीओ कार्यालयावर धडकअधिकाऱ्यांना विचारला जाब; नुसती दंड वसूली नको, लोकांना...

मनसे पदाधिकाऱ्यांची आरटीओ कार्यालयावर धडकअधिकाऱ्यांना विचारला जाब; नुसती दंड वसूली नको, लोकांना सुविधा देण्याची मागणी

मनसे पदाधिकाऱ्यांची आरटीओ कार्यालयावर धडक
अधिकाऱ्यांना विचारला जाब; नुसती दंड वसूली नको, लोकांना सुविधा देण्याची मागणी
.


ओरोस/प्रतिनीधी.


सिंधुदुर्ग आरटीओ कडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत आज मनसेकडून जाब विचारण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी “हेल्मेट” घालून पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी आरटीओ अधिकाऱ्याकडून केवळ दंड वसूल करण्याची कारवाई केली आहे. मात्र वाहन चालकांच्या समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी कोणतीही उपायोजना केली जात नाही. त्यामुळे याबाबत सकारात्मक धोरण ठरवा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावी देण्यात आला. मनसेनेच्या माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विनोद सांडव,बाबल गावडे,आशिष सुभेदार,राजेश टंगसाळी,दिपक गावडे,आबा चिपकर,अमोल जंगले, आपा मांजरेकर,रामा सावंत,विनायक गावडे,वैभव धुरी, दुलाजी चौकेकर यांसह अनेक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.