Homeकोंकण - ठाणेसीबीएसई दहावीचा निकाल आता आणखी लांबणीवर पडला आहे.- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने...

सीबीएसई दहावीचा निकाल आता आणखी लांबणीवर पडला आहे.- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शेड्यूल जारी.

सीबीएसई दहावीचा निकाल आता आणखी लांबणीवर पडला आहे.- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शेड्यूल जारी.

नवी दिल्ली. वृतसंस्था. 18

सीबीएसई (CBSE) दहावीचा निकाल (CBSE 10th Result 2021) आता आणखी लांबणीवर पडला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शेड्यूल जारी केलं आहे. सर्व सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि संस्थापकांना नोटीस जारी केली आहे. या नोटिसीत सीबीएसई बोर्डाने नवीन शेड्युल दिलं आहे.

याआधी सीबीएसईचा दहावीचा निकाल जूनमध्ये लागणार होता पण आता निकाल जुलैमध्ये लागणार आहे. कारण सीबीएसईने मार्क्स सबमिट करण्याच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

नव्या शेड्युलनुसार मार्क्स अपलोड करण्यासाठी पोर्टल उपलब्ध राहण्याची तारीख 20 मे 2021
या तारखेत काही बदल नाही. पण CBSE मार्क्स सबमिट करण्याची तारीख 30 जून 2021 आहे. इंटरनल असेसमेंट मार्क्स सबमिट करण्याची तारीख 30 जून 2021 आहे. त्यामुळे जूननंतर म्हणजेच जुलैमध्येच हे निकाल जारी होतील.

हे Sarkari Jobs : 9 हजाराहून अधिक जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

याआधी सीबीएसईने दहावी परीक्षांचा निकाल 20 जूनला जारी होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी मार्क्स सबमिट करण्याची तारीख 11 जून होती. पण आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे निकालही लांबणीवर पडला आहे. मार्क्स सबमिशनची डेट जूनच्या अखेरची असल्याने निकाल जुलैमध्येच लागणार आहे.

सीबीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षा 2021 साठी प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त 100 गुणांचं मूल्यांकन ठेवण्यात आलं आहे. त्यातील 20 गुण आंतरिक मूल्यांकन आणि 80 गुण वर्षभरात झालेल्या परीक्षांनुसार दिले जात आहेत. आतापर्यंत बहुतेक शाळांनी परीक्षांच्या मार्क्सचा डेटा सीबीएसई पोर्टलवर अपलो़ड केला आहे.

CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षाही होणार रद्द?

कोरोनाच्या सावटामुळे (Coronavirus in India) देशातील विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. देशातील महत्त्वाच्या अशा परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) बारावीची परीक्षा देखील कोरोनाच्या सावटाखाली आहे. देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा देखील रद्द केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान बोर्डाकडून अजून आठवडे तर सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा घ्यायच्या की रद्द करायच्या याबाबत निर्णय घेतला जाईल. शिक्षण मंत्रायलातील सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

हे Success Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला

मीडिया अहवालानुसार, परीक्षा रद्द करून असेसमेंट आधारीत योजना विद्यार्थ्यांसाठी आखली जाण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.