सरस्वती वाचनालय मडिलगे आयोजित – गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.

मडिलगे येथील सरस्वती वाचनालय मडिलगे आयोजित वाचन पंधरवडा व वाचन महिना कार्यक्रमाचे औचित्य साधुन मडिलगे हायस्कूल व प्राथमिक शाळा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व २०२२ सालात गावातील आपल्या कलागुणांनी यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा शनिवार दिनांक 15 रोजी संपन्न झाला. अध्यक्षतेस्थानी हनुमान समुहाचे अध्यक्ष के. व्ही. येसने होते. स्वागत व प्रास्ताविक सरस्वती वाचनालयाचे व लोकमान्य समूहाचे अध्यक्ष जनार्दन निऊगरे यांनी केले.
यावेळी डॉ. मारुती डेळेकर यांनी वाचन या विषयावर विद्यार्थी ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले यावेळी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तर २०२२ सालात झालेल्या एम.पी.एसी परीक्षेत राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले व मंत्रालयात सहाय्यक क्लार्क म्हणून पदावर रुजू होणारे विनायक वजरेकर तसेच बीए.एफ मध्ये देश सेवेत रुजू झालेली शिवानी पसारे यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष के.व्ही. येसने, माजी सभापती भिकाजी गुरव, यांनी मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाला ग्रामपंचायत मडिलगे सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच सुशांत गुरव, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य मडिलगे हायस्कूल मुख्याध्यापक सर्व स्टाफ, विद्यामंदिर मडिलगे मुख्याध्यापक सर्व स्टाफ हायस्कूल व प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सरस्वती वाचनालय सर्व संचालक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन येसने मॅडम यांनी केले आभार पोवार मॅडम यांनी मानले.

