Homeकोंकण - ठाणेअखेर खातेवाटप अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थ खाते. - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर...

अखेर खातेवाटप अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थ खाते. – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब. पहा तर कोणा – कोणाला मिळणार मंत्री पदाची संधी

अखेर खातेवाटप अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थ खाते. – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब.

मुंबई. – प्रतिनिधी.

मागील काही दिवसांपासून रखडलेले मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर आज झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. खातेवाटपाची फाईल राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी गेली होती. राज्यपाल यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप प्रसिद्ध करण्यात आले. या खातेवाटपमध्ये अनेक मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहे. भाजपकडून सहा तर शिंदेकडून तीन खाती गेली आहेत. एकनाथ शिंदे यांना महत्वाची खाती राखण्यात यश आले आहे. अजित पवार यांच्या गटाला शिवसेना आणि भाजप यांच्यातील काही मंत्र्यांकडील खाती येण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाचे खातेवाटप यादी…
अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन, संजय बनसोडे – क्रीडा, आदिती तटकरे – महिला बालविकास मंत्रालय, हसन मुश्रीफ – वैदकीय शिक्षण, अनिल पाटील – मदत पुनर्वसन, दिलीप वळसे पाटील – सहकार, धनजंय मुंडे – कृषी खाते
छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, धर्मरावबाबा आत्रम – अन्न व औषध पुरवठा

महाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीकडे कोणती खाती होती ?

वित्त आणि नियोजन,गृह खाते,
ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण
राज्य उत्पादन शुल्क, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य
अन्न आणि नागरी पुरवठा
अन्न आणि औषध प्रशासन
अल्पसंख्यांक कामगार.

एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली आहेत.

कृषी, मदत आणि पुनर्वसन
अन्न आणि औषध प्रशासन

भाजपकडून सहा खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.
अर्थ, सहकार, वैद्यकीय शिक्षण,
अन्न नागरी पुरवठा
क्रीडा, महिला आणि बालकल्याण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.