बहिरेवाडी ग्रामस्थ आयोजित गाव मर्यादित सुदृढ बैल जोडी स्पर्धा – शुभारंभ सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ शुभहस्ते.
आजरा.- प्रतिनिधी.
बैल जोडी प्रेमी बहिरेवाडी ग्रामस्थ यांचे मार्फत आयोजित गाव मर्यादित सुदृढ बैल जोडी स्पर्धा – २०२३ या स्पर्धेचे शुभारंभ सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.नविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते स्पर्धेची सुरुवात केली.
या स्पर्धेमध्ये बिनदाती गट, दाती गट, चार – सहा दाती गट व बैलजोडी बडाव गट अशा चार गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले. प्रत्येक विजेत्या गटात प्रथम क्रमांक ५००१/-, द्वितीय क्रमांक ४००१/-, तृतीय क्रमांक ३००१/- व विजेत्या सर्वांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजक सर्जराव पाटील व त्यांच्या टीमने स्पर्धेचे आयोजन नेटक्या पद्धतीने व नियोजन पूर्व केले होते.
यावेळी आजरा तालुक्यातील तहसीलदार समीर माने, सरपंच रत्नजा प्रल्हाद सावंत, उपसरपंच दत्तात्रय मिसाळ, विकास चोथे, भाग्यश्री आवळे, उल्का गोरूले, सरिता जोंधळे, स्वाती चव्हाण, सुरेश खोत, गोविंद सावंत, अनिल चव्हाण, अर्जुन कुंभार, आण्णा पाटील, दत्ता गुरूले, सर्जेराव पाटील, सुरेश कडाकणे, गुलजार तशिलदार, वसंत मिसाळ, जंबोआण्णा गोरूले, तलाठी के.डी.सोनावणे, सर्कल थोरात, प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
