आजरा कानोली येथे मोफत आरोग्य शिबीर.( ६० हुन अधिक रुग्णाची मोफत रक्ताची तपासणी .)
. आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील ग्रा.प .कानोली आणि संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटल साईट चिंचेवाडी यांचे संयुक्त विद्यमाने कानोली येथील प्राथमिक उपकेंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले . या आरोग्य शिबीराचे उदघाटन सरपंच सौ.सुषमा पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी शिबिराच्या प्रमुख आणि संत गजाजन महाराज कॅन्सर सेंटर ,चिंचेवाडी येथील डॉ.अर्चना उगले मॅडम यांनी विविध आजारांची लक्षणे आणि त्यावरील उपचार याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच उतारवयात नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी ,याबाबत मौलिक मार्गदर्शन केले,या शिबिरात ६० हुन अधिक ग्रामस्थ यांची रक्ताची तपासणी करण्यात आली या तपासणीतून शरीरातील विविध तपासण्या होणार आहेत. यावेळी बोलताना सरपंच सौ. पाटील म्हणाल्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रमुख या नात्याने या शिबीराचे आयोजन करण्यात आले, यापुढेही गावातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. यावेळी प्रा.आरोग्य केंद्र मलिग्रे येथील आरोग्य सहायक जे.एस. बोकडे याना जि. प.कोल्हापूर चा राजर्षी शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रा.आरोग्य केंद्र मलिग्रेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.के.के.काझी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरास, ग्रा.प.सदस्य अनिल पाटील ,चंद्रकांत पाटील,सौ.शुभांगी पाटील,सारिका भोसले,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीपतराव देसाई,बाजीराव पाटील,चंद्रकांत आपगे ,चंद्रकांत पाटील,शिवाजी पाटील,दत्ता भोगण परशुराम आपगे,शंकर पाटील, संगीता देसाई ,आरोग्य सेवक अभिजित माळवे अंगणवाडी सेविका रंजना आपगे,मंगल पाटील,शोभा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आभार सुभाष पाटील यांनी मानले.
