Homeकोंकण - ठाणेआंबोली धबधबा परिसरात पर्यावरणास बाधा पोहचविणाऱ्यांवर कारवाई करणार.- उप वनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी...

आंबोली धबधबा परिसरात पर्यावरणास बाधा पोहचविणाऱ्यांवर कारवाई करणार.- उप वनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी ( संयुक्त वन व्यवस्थापन समिती पर्यटकांना आकारणार शुल्क. )

आंबोली धबधबा परिसरात पर्यावरणास बाधा पोहचविणाऱ्यांवर कारवाई करणार.- उप वनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी ( संयुक्त वन व्यवस्थापन समिती पर्यटकांना आकारणार शुल्क. )

आजरा.:-प्रतिनिधी.

आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की, धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात तसेच वनहद्दीत कचरा करु नये. वनास व पर्यावरणास बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य करु नये. भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव अधिनियम १९७२ या कायद्यांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषतः भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ड प्रमाणे शासकीय जंगलात अपप्रवेश केल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा सावंतवाडी वन विभागाचे उप वनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून सावंतवाडी तालुक्यातील मौजे पारपोली वनक्षेत्रात आंबोली धबधबा येतो. आजरा तालुका नजीक असल्याने कोल्हापूर जिल्ह्या सह राज्यातील पर्यटक या धबधब्याचा निसर्गसौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी व वर्षा पर्यटनासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक आंबोली धबधब्यास भेट देत असतात. सदर धबधबा हा आंबोली घाटातील राज्य महामार्गावर स्थित असून, याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पर्यटकांच्याकडून धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात प्लास्टीक कचरा, बॉटल, खाद्यपदार्थाचे रॅपर तसेच इतर घनकचरा केला जातो. त्यामुळे पर्यावरणास बाधा निर्माण होवून वनातील जैवसाखळीवर त्याचा दुष्परिणाम होतो. तसेच पर्यटकाकडून होणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे वन्य जीवांच्या अधिवासास बाधा निर्माण होते.
यंदा मान्सून उशीरा दाखल झाल्याने जून महिन्याच्या शेवटी आंबोली मुख्य धबधबा प्रवाहीत झाला. व वर्षा पर्यटनाला सुरुवात झाल्याने वनविभागाने धबधब्याच्या व्यवस्थापनाबाबत व तेथील घनकचरा साफ करून सदर परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नियोजन केले आहे. वनास व पर्यावरणास बाधा पोहचवणाऱ्या बाबींचा उपद्रव कमी करण्याच्या दृष्टीने सदर ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांकडून उपद्रव शुल्क वसुल करण्यात येणार आहे.
मुख्य धबधबा पारपोली वनहदीत असलेने आंबोली धबधब्यास भेट देणाऱ्या पर्यटकांच्याकडून १४ वर्षावरील व्यक्तीस रु. २० व पाच वर्षा वरील मुलास रु.१० असे शुल्क पारपोली संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत आकारण्यात येईल. पारपोली वनक्षेत्रातील आंबोली मुख्य धबधबा येथे उपद्रव शुल्क म्हणून संकलीत करण्यात आलेला निधी संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोलीच्या खात्यावर जमा करण्यात येईल. जमा होणाऱ्या रकमेतून धबधबा व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या मजुरांचे मानधन व इतर खर्चासाठी करण्यात येईल. शिल्लक रहाणारी रक्कम मौजे पारपोली मीजे आंबोली व मौजे चौकुळ येथील वनविकासासाठी वापरण्यात येईल.
मुख्य धबधब्यावरील पर्यटन उपद्रव शुल्क वसुल करताना तसेच अनुषंगीक बाबींमध्ये कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला म्हणुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यत येईल. कायदा व सुव्यवस्था याचा भंग झाल्यास पोलीस बळाची मदत घेतली जाईल व संबंधीत कायदा व सुव्यवस्था मोडण्यऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल व प्रंचलीत नियमानुसार दंडात्मक रक्कमेची आकारणी करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.